post office sakal
सोलापूर

सोलापूर : पोस्टाद्वारे मिळकतकर पावत्यांचे वाटप

महापालिकेला ३५ लाख रुपयांचा भुर्दंड, खुल्या मिळकतींचे वाटप कर्मचाऱ्यांकडून

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका कर आकारणी विभागाकडून इतिहासात प्रथमच पोस्टाने मिळकतकर पावत्यांचे वाटप होणार आहे. या पोस्ट प्रक्रियेमुळे महापालिकेला साधारण ३५ लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.महापालिका कर विभागाच्या माध्यमातून केवळ मिळकत बिलाचे वाटप व वसुली याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर होती. कर विभागातील कर्मचाऱ्यांची ठरलेली कामाची पद्धत आणि कर्मचाऱ्यांची वसुली रक्कम देखील ठरलेली होती. ही जुनाट कार्यपद्धती बंद करून कर विभागामध्ये अद्ययावत प्रणाली उपयोगात आणून महसूल वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या.

तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये वाढ करीत वॉटर ऑडिट, वाढीव पुरवणी बिलाचे वाटप, ओबीसी डाटा संकलन, बोगस नळांचा शोध आदी अतिरिक्त कामांचा समावेश केला. महापालिकेच्या आर्थिक हितासाठी या सगळ्या बाबी योग्य असल्या तरी कामचुकारपणा अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हेत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या आहेत. मिळकतींमधील वाढीव बिलाबाबत तांत्रिक चुका आढळून आल्याने एक लाख ८ हजार बिलांपैकी ५५ हजार बिले रद्द करण्याची वेळ आली. यावेळी देखील छपाई झालेले ५५ हजार बिले धूळखात पडून आहेत.

मिळकतींमध्ये झालेल्या बदलानुसार वाढीव बिल न देता नियमित बिलांची वाटप प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी पुन्हा दोन लाख १० हजार मिळकत कर पावत्यांची छपाई झाली. त्यातील एक लाख ४० हजार मिळकतींना पोस्टमनद्वारे मिळकत कराचे बिल मिळणार आहे आणि उर्वरित साधारण ७० हजार मिळकतींना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कर पावत्या वाटप केल्या जाणार आहेत. परंतु, पोस्टामुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे. साधारण ३५ लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. हा खर्च महापालिका नागरिकांच्या खिशातूनच वसूल करणार असल्याने याचा अप्रत्यक्ष आर्थिक फटका शहरवासीयांना बसणार आहे.

पोस्टाचे फायदे व तोटे

पोस्टाद्वारे मिळकतकर घरोघरी पोच केल्यास बिल पोचल्याची अधिकृत पोच मिळेल

वेळेवर कर न भरणाऱ्या नागरिकांना बिल मिळाले नाही, असे कारण सांगता येणार नाही

मिळकतदार नसल्याने करबिल दिले नाही अथवा इतर चुकीची उत्तरे कर्मचारी देऊ शकणार नाहीत

पोस्टाद्वारे मिळकतकर वाटपास विलंब लागण्याची शक्यता अधिक

महापालिकेच्या स्टेशनरी खर्चात होणार वाढ

कर्मचाऱ्यांद्वारे वाटपाचे फायदे

बहुतांश मिळकतदारांना महापालिका कर्मचारी ओळखत असल्याने बिल वाटप प्रक्रिया जलद गतीने होते

कर पावती दिल्यानंतर बहुतांश मिळकतदारांकडून कर्मचारी कर वसुली करत असल्याने महापालिकेचे उत्पन्न सुरू राहते

पोस्टावर होणारा आर्थिक खर्च वाचणार आहे

महापालिकेचे करबिल हे प्रथमच पोस्टाद्वारे वाटप होत आहेत. यामुळे मिळकतदारांना वेळेवर बिले मिळतील. खुल्या मिळकतींच्या कराचे बिल वाटप कर्मचाऱ्यांमार्फत होणार आहे. बिल वाटपाचे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करून वसुलीच्या टार्गेटवर भर देण्यात येणार आहे.

- श्रीराम पवार,सहाय्यक आयुक्त, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT