logo 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन 

प्रमोद बोडके

सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून याचे 94 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सीटी सर्वे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी घालण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. 

जिल्ह्यातील 12 तालुक्‍यातील 353 गावात सीटी सर्व्हे झाला आहे. जिल्ह्यातील परीरक्षण भूमापकाचे काम झाले असून अंतिम तपासणी करून लवकरच सर्व मिळकत पत्रिका जनतेला ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे श्री. सानप यांनी सांगितले. जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून यातील दोन लाख 82 हजार 684 मिळकत पत्रिकांची तपासणी करून प्रत काढण्यात आली आहे. राहिलेल्या 19 हजार 674 मिळकत पत्रिकांची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक लाख 12 हजार 775 मिळकत पत्रिकांची डिजीटली स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले असल्याने मिळकतदारांना लवकरच ऑनलाईन मालमत्ता पाहता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT