Solapur district Found eight new corona patients sakal
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात आढळले आठ नवे रुग्ण

अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर कोरोनामुक्‍त; ९७ रुग्ण घेताहेत उपचार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून अजूनपर्यंत ओमीक्रॉनचा संशयित जिल्ह्यात आढळलेला नाही. शहरातील सहा तर ग्रामीणमधील ९१ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट व दक्षिण सोलापूर हे दोन्ही तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख चार हजारांहून अधिक व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील दोन लाखांपर्यंत रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला. शहरातील प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्याची स्थिती असून ग्रामीणमधील मृत्यूदेखील कमी झाले आहेत. आता बार्शीतील सात, करमाळ्यातील १२, माढ्यातील १५, माळशिरस तालुक्‍यातील नऊ, मंगळवेढ्यातील दोन, मोहोळ तालुक्‍यातील सहा, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तीन, पंढरपूर तालुक्‍यातील १८ तर सांगोल्यातील नऊ रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस झालेल्या तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या कोरोना बाधित जिल्ह्यातील २३ महिला आणि ७४ पुरुषांवर उपचार सुरु आहेत. डिसेंबर महिन्यात शहर-ग्रामीणमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु, कोरोना कमी झाला म्हणून नियम पायदळी तुडवून बिनधास्तपणे वावरु नका, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केल्या आहेत.

‘ओमीक्रॉन’बाबत आरोग्य विभागाचे आवाहन...

  • कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्या

  • गर्दीत विनाकारण जाऊ नका; चेहऱ्यावरील मास्क काढू नका

  • ओमीक्रॉन हा हवेतून पसरत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागेल

  • सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवावेत आणि घरी गेल्यावर कपडे बदला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT