आमदार राजेंद्र राऊत
आमदार राजेंद्र राऊत sakal
सोलापूर

सोलापूर : जिल्ह्याला मिळणार तीन मंत्रिपदे?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट तर राम सातपुते किंवा सचिन कल्याणशेट्टी या युवा चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. दुसरीकडे काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल म्हणत देशभर प्रकाशझोतात आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटलांनाही एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढविली. पण, ऐनवेळी मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आणि सर्वाधिक आमदार विजयी होऊनही भाजपला विरोधात बसावे लागले. सुरवातीला राष्ट्रवादीचा गट फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले. पण, त्यांचा तो डाव फारकाळ यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोंडी झालेल्या शिवसेनेतील आमदार, मंत्र्यांवर जास्त फोकस केला. त्यांचा हा डाव सध्यातरी यशस्वी झाला. थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान देत ५५ पैकी ३९ आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे पक्षप्रमुखांना अर्ध्यातूनच पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपच्या आमदारांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

आता भाजपमधील जुन्यांना मंत्रिपदाची आशा लागली आहे. तर काही नवख्या आमदारांनाही लॉटरी लागेल, असा विश्वास आहे. त्यात भाजपच्या वाट्यातून जिल्ह्याला दोन तर शिवसेनेच्या (बंडखोर गट) कोट्यातून एक मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे.

स्वबळावर सत्ता आणण्याचाच राहणार प्रयत्न

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर राज्याची सत्ता मिळावी, यादृष्टीने भाजपचा प्रयत्न राहणार हे निश्चित. जिल्ह्यात भाजपला २०१९ च्या निवडणुकीत मोठे यश मिळाले. आता आमदारांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात वाढावी, त्यासाठी कोणता आमदार लाभदायी ठरू शकतो, अशांना मंत्रिपदे मिळतील, असेच चित्र आहे.

राजेंद्र राऊत, संजय शिंदेंचीही चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार हे तीन-चार दिवसांत स्पष्ट होऊ शकते. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी फडणवीसांसोबत पक्षविरहित मैत्री जपल्याने त्यांनाही लॉटरी लागू शकते, असेही बोलले जात आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची देखील चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT