Survey 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्याला मिळाले 250 कोटी रुपये ! अतिवृष्टी, महापूर नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरसह महाराष्ट्रात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. महापूर आला. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकारच्या वतीने मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 250 कोटी 71 लाख 82 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. 

राज्य सरकारच्या महसूल विभागाने गुरुवारी राज्यासाठी 2 हजार 192 कोटी 89 लाख रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. नुकसानीच्या मदतीचे वाटप करण्यासाठी हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले आहे. तरीही ही मदत वाटप करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महसूल व वन विभागाने त्या - त्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

एसडीआरएफच्या दरानुसार व वाढीव दरानुसार शेती पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्‍टरी 25 हजार रुपये या प्रमाणे मदत केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी 503 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली होती. पहिल्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 251 कोटी तर दुसऱ्या हप्त्यात 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याने शेतीच्या नुकसानीसाठी जेवढी मागणी राज्य सरकारकडे केली होती, जवळपास तेवढा निधी सरकारकडून सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT