Covishield_Vaccine 
सोलापूर

जिल्ह्यासाठी मिळाले कोरोनाचे 25 हजार डोस ! पाच दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याने दोन लाख डोसची मागणी केली. त्यानुसार रविवारी जिल्ह्यासाठी 25 हजार 400 डोस प्राप्त झाले असून, दररोज आठ हजार जणांना लस टोचली जात आहे. त्यामुळे ही लस आगामी पाच दिवस पुरणार आहे. 

पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लस घेतलेले आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर आता दुसऱ्या डोससाठी येत आहेत. तर पहिला डोस टोचून घेणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दररोज आठ हजार डोस टोचले जात असून जिल्ह्यातील लशीचा साठा पुढील आठवड्यात संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्राच्या माध्यमातून वेळेत लस उपलब्ध करून द्यावी, असे पत्र जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी पाठविले आहे. मात्र, लस उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्याने काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी तथा तालुक्‍यात लस टोचण्यांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणचे शिल्लक डोस उपलब्ध करून दिले जात आहेत. पुढील दहा-बारा दिवसांत आणखी लस उपलब्ध होतील, असा विश्‍वास लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी व्यक्‍त केला आहे. 

आणखी लशीची नोंदविली मागणी 
जिल्ह्यासाठी दोन लाख डोसची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी शहर - जिल्ह्याला 25 हजार 400 डोस प्राप्त झाले असून पूर्वीचे सुमारे 20 हजार डोस शिल्लक आहेत. 
- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, 
जिल्हा समन्वयक, कोरोना लसीकरण, सोलापूर 

पाच दिवस पुरेल इतकीच लस 
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले लोक) रुग्णांना तर 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठांना कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे. लस टोचून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली असून शहर - जिल्ह्यातील सुमारे 60 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. खासगी रुग्णालयांनाही त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दररोज आठ हजार व्यक्‍तींना लस टोचली जात असून सध्या जिल्ह्यात 45 हजार 400 डोस शिल्लक आहेत. पाच दिवस पुरेल इतकीच लस उपलब्ध असून आणखी दोन लाख डोस द्यावेत, अशी मागणी आरोग्य विभागाने नोंदविली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT