solapur sakal
सोलापूर

सोलापूर : डॉक्टरांनी तपासलंय, आता गोळ्या द्या वो सायेब

सर्वोपचार रुग्णालयात औषध वाटपासाठी तीनच कर्मचारी; रुग्ण तासन्‌तास रांगेत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सकाळपासून बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची वाढलेली गर्दी... शंभरपेक्षा अधिक डॉक्टरांकडून रुग्ण तपासणीचे दिवसभर चाललेले काम... अशक्त, थकवा आलेले वृद्ध, महिला रुग्ण हातात औषधांची चिठ्ठी घेऊन औषध खिडकीच्या जवळ तासन्‌तास लागलेल्या रांगांत उभारलेले... ‘अहो सायेब, डॉक्टरांनी तपासलंय, आता गोळ्या द्या वो...’ अशी आर्त विनंती करणाऱ्या रुग्णांची अडचण सुटत नाही... हे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. दिवसभर बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागातून सुटी झालेले रुग्ण, अचानक अपघाताच्या घटनेमुळे तत्काळ दाखल झालेले रुग्ण या प्रकारच्या अनेक रुग्णांची रुग्णालयात मोठी गर्दी असते. पण एवढ्या रुग्णांना दिवसभरात वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट डॉक्टर्स असे १०० डॉक्टर्स तपासून त्यांना औषधी लिहून देतात. नंतर ती चिठ्ठी घेऊन ओपीडी कक्षात यावे लागते. दिवसभरातील हजारो रुग्णांसाठी केवळ सहा खिडक्या आहेत.

या खिडक्यांवर आधीच संगणकीय प्रणाली बंद आहे. या खिडक्यांवर कधी तीन तर कधी चारच कर्मचारी असतात. त्यापैकी कोणी सुटीवर किंवा रजेवर असला की आणखी पंचाईत होते. रुग्ण तासन्‌तास औषधांसाठी उभे असतात. अशक्त व थकलेले रुग्ण तेथेच कोठेतरी खाली बसून औषध कधी मिळेल, याची वाट पाहतात. कारण, औषधी विभागात औषध वाटप कर्मचारी उपलब्धच नाहीत. चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचारी भरले गेले नाहीत. त्यामुळे औषध वाटपाला उशीर लागत आहे. यामुळे कर्मचारी देखील त्रासून गेले आहेत.

अशी ही गर्दी रुग्णांची

दररोज बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण १०००

रक्तदाब, हृयविकार व मधुमेहाचे रुग्ण २०० ते ३००

ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण २०० ते ३००

विशेष आजार व स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी केलेले रुग्ण २००

आंतररुग्ण विभागातून किंवा शस्त्रक्रिया होऊन सुटी झालेले रुग्ण १०० ते २००

कर्मचाऱ्यांची सद्य:स्थिती

औषध वाटप खिडक्यांवर असलेले फार्मसिस्ट कर्मचारी : ३

एकूण कर्मचारी पदे : ११

सेवानिवृत्त झालेले कर्मचारी : ४

कामावर असलेले कर्मचारी : ७

सध्या रुग्णालयात पावसाळ्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. पण त्या तुलनेत फार्मसिस्ट कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते आहे. तरीही त्यातून रिक्त पदे भरण्याचा काही मार्ग काढून हा प्रश्न सोडवला जाईल.

- डॉ. रोहन खैराटकर,वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT