Manoj Jarange Patil sakal
सोलापूर

Solapur : आरक्षणासाठी आत्महत्या करू नका; पोरचं मेली तर आरक्षण घेवून करायचं काय - मनोज जरांगे पाटील

आत्महत्येची घटना घडणार नाही याची काळजी घ्या,कारण पोरचं मेली तर आरक्षणाला घेवून करायचा काय ?

सकाळ वृत्तसेवा

अश्पाक बागवान

बेगमपूर - लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग म्हणून आरक्षण मिळालेच पाहिजे,ही आपली हक्काची मागणी आहे,यासाठी शासनाला वेळ ही दिलेला आहे.यासाठी आपली आंदोलने शांततेच्या मार्गाने सुरू आहेत.हाच मार्ग शेवटपर्यंत टिकवून ठेवा.समाजातील पोरांनो आरक्षणासाठी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू नका,

यापुढे एक ही आत्महत्येची घटना घडणार नाही याची काळजी घ्या,कारण पोरचं मेली तर आरक्षणाला घेवून करायचा काय, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बेगमपूर(ता.मोहोळ)येथे आयोजित कॉर्नर सभेत व्यक्त केले. जरांगे पाटील यांचे

सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरील येथील मुख्य चौकात गुलाब पाकळ्यांची उधळण करीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शैला गोडसे,

संयोजक तथा उद्योजक वसंत पवार,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, माऊली पवार,गजाजन गुंडाळे,रामेश्वर सुरवसे,दिगंबर कावळे, बालाजी सरवळे,केशव पाटील ,आबासाहेब जगदाळे,माणिक सुरवसे, आदीसह मोठ्यासंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले,शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आला आहे.शांततेच्या मार्गाने आपण केलेल्या मागणीची आणखी वाट पाहू.जाळपोळ, दंगल ,आत्महत्या हे मार्ग स्वीकारू नका.आपल्या मागणीचा योग्य विचार मान्य न झाल्यास शासनाच्या छाताडवर बसून आरक्षण मिळवू असे आव्हान करीत त्यांनी आगामी जालना येथे होणाऱ्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी समाजाची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT