electricity bill 
सोलापूर

सोलापुरात 81 कोटींचे वीजबिल थकीत अन्‌ थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालयांचाही समावेश ! 

विजय थोरात

सोलापूर : महावितरण सोलापूर परिमंडळात थकीत वीज देयकांची रक्कम 81 कोटींच्या घरात पोचली आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांचाही समावेश आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्य व उद्योग, पाणीपुरवठा योजना आदी सर्वच थकबाकीदारांना महावितरणकडून नोटिसा बजावणे सुरू झाले आहे. देयक भरले नाही तर धडक कारवाईची मोहीम राबविण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे. 

सोलापूर महावितरण परिमंडळात जवळपास दोन लाख 11 हजार ग्राहक आहेत. यात एक लाख सहा हजार 821 थकबाकीदार आहेत. यामध्ये 273 ग्राहकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांमध्ये घरगुती, वाणिज्य, उद्योग, पथदिवे आदींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी महावितरणने केली आहे. 

वीज बिल भरण्यासाठी हप्त्यांची मुभा 
लॉकडाउनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना विविध सुलभ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत दिली आहे. सोबत थकबाकीदारांना विलंब आकार न लावण्याचा निर्णय घेण्यात आला व ग्राहकांच्या वीज बिलासंबंधित तक्रारी असल्यास तत्काळ सोडविण्यासाठी समिती तयार करण्यात आली, असे देखील महावितरणकडून सांगण्यात आले आहे. 

कारवाईसाठी पथके तैनात 
सोलापूर परिमंडळात वीज बिल देयके वसूल करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्‍यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीशिवाय महावितरणला पर्याय नाही. त्यामुळे कारवाई सुरू झाली आहे. 

महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय नाही. त्यामुळे सोलापूर परिमंडळातील सर्व ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. 
- चंद्रकांत दिघे, 
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सोलापूर शहर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT