solapur  sakal
सोलापूर

Solapur : ऊसापासुन इथेनॉल निर्मिती करणार ; हंगामात साडे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट - विश्वराज महाडिक

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची 48 वी सर्वसाधारण सभा शनिवार ता 30 रोजी संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

राजकुमार शहा

मोहोळ - संस्था जिवंत ठेवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, येत्या काळात असावनी प्रकल्पाची जबाबदारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खा धनंजय महाडिक यांनी माझ्यावर सोपविली आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर उत्पादन क्षमता असलेल्या या प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, तो लवकरच कार्यान्वित करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने साडेसहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे प्रतिपादन भीमा चे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केले.

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची 48 वी सर्वसाधारण सभा शनिवार ता 30 रोजी संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या हंगामातील ऊस बिल देण्यासाठी थोडी अडचण झाली मात्र यावेळी तसे होणार नाही.

गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना सज्ज झाल्याचे अध्यक्ष महाडिक यांनी सांगितले. नैसर्गिक अडचणी पेक्षा मानव निर्मित अडचणी मोठ्या प्रमाणात आल्या परंतु सभासद व कामगार यांच्या सहकार्याने त्यावर मात करता आली. भविष्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादित करण्याचा प्रकल्प भीमा सुरू करणार आहे.

यावेळी खा धनंजय महाडिक म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारात अमुलाग्र बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. सहकाराचा अभ्यास असल्याने त्यांनी माझी सहा समितीवर निवड केली आहे. लहाना पासून मोठ्या सहकारी संस्था तयार करण्याचे निर्णय त्यांनी घेतले आहेत या संस्थांना 27 प्रकारचे प्रकल्प राबविण्याची ताकद दिली जाणार आहे.

मोहोळ तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, चिकू, सफरचंद, ही फळे उत्पादित होतात, त्यासाठी प्रोसेसिंग युनिट व कोल्ड स्टोरेज अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कुणी प्रयत्न करणार असेल तर त्याला आमचे सहकार्य राहील अशी ग्वाही खा महाडिक यांनी दिली. भविष्यात भीमा "ग्रीन हायड्रोजन प्रकल्प"ही सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

भविष्यात फक्त ऊस गाळून साखर उत्पादित करून चालणार नाही, सभासदाला दर देण्यासाठी वेगवेगळे उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे व तसा प्रयत्न भीमा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शेती अधिकारी शिवरकर, धनंजय देशमुख, शिवाजी शेंडगे, संतोष चव्हाण, पांडुरंग ताटे, भारत पाटील, झाकीर मुलाणी, माणिक बाबर, शिवाजी गुंड, राजू बाबर, महादेव देठे, छगन पवार, लिंगराज शेंडगे, बंडू शेख, सुनील चव्हाण, आदीसह सर्व संचालक, खाते प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग ताटे यांनी केले.आभार तात्यासाहेब नागटिळक यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT