Fake Certificate eskal
सोलापूर

Solapur : बनावट जातीचा दाखला,मंगळवेढ्यात महा-ई-सेवा चालकावर गुन्हा

महा ई सेवा केंद्र चालकात खळबळ उडाली

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : संगणक व प्रिन्टरचा वापर करुन अर्जदारास बनावट जातीचा दाखला देवून फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवेढयातील ऑनलाईन सोल्यूशन महा ई सेवा केद्राच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणाने महा ई सेवा चालकात खळबळ उडाली.

याप्रकरणाची फिर्याद निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे वय 44 यांनी दाखल केली केली असून पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  अमृता महादेव चव्हाण रा बावी ता माढा यांनी रामोशी जातीचा दाखला काढण्यासाठी मंगळवेढा येथील न्यायालयासमोरील संशयीत आरोपी अजित नामदेव सोळगे यांच्या ऑनलाईन महा ई सेवा केंद्रात दि 26 एप्रिल 22 रोजी अर्ज दाखल केला केला त्यानुसार बारकोड क्र 12842203115005118448 या क्रमांकाने धनगर या जातीचा दाखला वितरीत करण्यात आला तक्रारीनंतर या दाखल्याची चौकशी केली असता कोळी अमोल येदू या नावाचा असल्याचे निश्पन्न झाले त्यानंतर अमृता चव्हाण यांना तहसील कार्यालय मंगळवेढा येथे बोलावून चौकशी केली असता

त्यांनी आपली बनावट दाखला देवून फसवणूक केली असल्याचे जबाबात नमुद केली त्यावरुन नायब तहसीलदार धाईजे यांनी संगणकावर फेरफार करुन प्रिंटरच्या साहयाने तांत्रीक फेरबदल करुन बनावट जातीला दाखला देवून फसवणूक केल्याप्रकरणी वरिष्ठाचा आदेश 1141/2022 दि.10/10/2022 च्या आदेशनुसार चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणाने महा ई सेवा केंद्र चालकात खळबळ उडाली.वास्तवित पाहता विविध दाखल्यासाठी या केंद्र चालकाडून ग्रामीण भागातीेल जनतेकडून अव्वाच्या सव्वा रकमा घेतल्या जातात त्याबाबतचे दरपत्रक देखील या कार्यालयात उपलब्ध नसते काही वेळी दाखला किती वेळेत दायचा यावरुन दर ठरविले जात असल्याने महसूल खात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याने असे बनावट दाखले वितरीत केले जातात .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT