solapur sakal
सोलापूर

सोलापूर : शस्त्रक्रियेमध्ये त्रुटीने महिलेच्या पोटातील आतडी बाहेर

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेमध्ये त्रुटी झाल्यामुळे महिलेच्या पोटातील आतडी बाहेर

गुरूदेव स्वामी

भोसे : भोसे ता. मंगळवेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलेला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेमध्ये त्रुटी झाल्यामुळे महिलेच्या पोटातील आतडी बाहेर पडल्याने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या प्रकरणात रस्त्यावरील खड्डे जबाबदार असलेला निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील खडकी येथील पल्लवी शंकर घोगरे या महिलेस कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 19 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचे टाके तोडून तिला 25 ऑगस्ट रोजी डिस्चार्ज देऊन घरी नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर काही वेळात त्या महिलेच्या टाके तोडलेल्या जागेतून पोटातील आतडी बाहेर पडल्यानंतर घाबरून तिच्या पतीने भोसे आरोग्य केंद्रात संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली असता आरोग्यसेविका तासाभरानन्तर खडकी येथे संबंधित महिलेच्या घरी गेली त्या महिलेला घेऊन मंगळवेढा येथे खाजगी वहानात घेऊन मंगळवेढा येथे गेली मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला असता रात्री उशिरा मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पाठवण्यात आले रात्री साडेदहा वाजता सोलापूर येथील सिव्हिलमध्ये तिच्यावर उपचाराची प्रक्रिया सुरू झालि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांच्या मतदारसंघातील हा प्रश्न असून आरोग्य केंद्र विकासासाठी कोट्यावधीचा निधी देऊन देखील या भागातील आरोग्य सुविधा ही कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले.

भोसेच्या आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेत त्रुटी ठेवल्याने रुग्णास मोठ्या त्रासास सामोरे जावे लागले शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी रुग्णालयात देखील त्यानि उपचार करण्यास नकार दिल्यामुळे आम्हाला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक येणार असल्याचे सांगत सध्या प्राथमिक उपचार केले आहेत.

सविता घोगरे रुग्ण महिलेची सासू

संबंधित महिलेला शास्त्रक्रियेनंतर त्रास झालेनंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले असून खराब रस्त्यावरील खड्ड्याचे हादरे बसून किंवा जोरदार खोखलयामुळे अथवा वजन उचलल्याने व टाके ओले असल्याने काही महिलांना असा त्रास होऊ शकतो शस्त्रक्रियेत कोणतीही चुक झालेली नाही

डॉ भाऊसाहेब जानकर तालुका वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT