Solapur sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान मात्र 65 मिलिमीटर ची अट शेतकऱ्यांना अडचणीची

मोहोळ तालुक्यातील काही भागात पाऊस पडून विविध पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील काही भागात पाऊस पडून विविध पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासन निकषा प्रमाणे 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही. तसेच शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या "ॲप" वरून पीकपाहणी केली नसल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. तरीही ज्या भागात नुकसान झाले आहे त्या नुकसान ग्रस्त क्षेत्राला तलाठी व कृषी सहाय्यक यांना समक्ष भेटी देऊन नुकसानीचा नजर अंदाज अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

तालुक्यातील पाऊस पडून झालेल्या नुकसानी बाबत कृषी सहाय्यक, तलाठी व मंडल निरीक्षक यांना सूचना देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. सर्व तलाठी व कृषी सहाय्यकांना नुकसानीचा नजर अंदाज देण्याच्या सूचना दिल्या असून, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर तालुक्याच्या नुकसानीचा एकूण अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे व त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशान्वये पंचनामे करण्यात येणार आहेत.त्यानंतर नुकसानीच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तक्रारी व अडचणीचा विषय आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी करणार असल्याचेही तहसीलदार बेडसे यांनी सांगितले.

आपापल्या गावात किती पाऊस पडला या बाबत नक्की माहिती मिळविण्या साठी गावोगावी पर्जन्य मापक बसवणे गरजेचे आहे. एका पर्जन्य मापकाची किंमत सुमारे सहा ते सात हजार असणार आहे, हे काम ग्रामपंचायत ही करू शकते. आवश्यकते नुसार तशा त्यांना सूचनाही देण्यात येणार आहेत. सध्या शासना कडुन बागायत पिकाच्या नुकसानी साठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये, जिरायती पिकाच्या नुकसानी साठी 6 हजार 800 रुपये तर फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जाते.

---- मोहोळ तालुक्यात मंडल निहाय पडलेला सरासरी पाऊस पुढील प्रमाणे--------

मोहोळ-583.68

वाघोली-380

कामती-540

टाकळी-289.9

सावळेश्वर-398

नरखेड-518

शेटफळ-444

पेनुर-281.8

तालुक्याची पावसाची एकुण सरासरी-600 मिलीमिटर तालुक्यात पडलेला एकुण पाऊस-430 मिलीमिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT