युरियासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक sakal
सोलापूर

सोलापूर : उत्तर तालुक्यात युरियासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक

जादा दर आणि अनावश्यक खते घेण्यासठी सक्ती

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या खरीप ,रब्बी हंगामातील पिकांना खते ,औषधे फवारणी, पाणी देण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र उत्तर सोलापूर तालुक्यात कृषी सेवा केंद्र धारकातून कृत्रिम युरिया खताची टंचाई निर्माण केली जात आहे. तसेच इतर खते औषधे घेणार असेल तरच युरिया दिला आहे. अनावश्यक खते औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहेत. यामुळे शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तसेच किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे.

याकडे उत्तर सोलापूर तालुका कृषि विभाग कानाडोळा करीत आहे.यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या कृषि विभागाकडून तालुक्यात ऐन हंगामात कृषि केंद्रांकडे तपासणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या कांदा, हरभरा, गहु, भाजीपाला चारा पिकांसाठी युरियाची गरज भासत आहे मात्र शेतकऱ्यांची काही कृषि केंद्र धारकाकडून अडवणूक होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

"सध्या मका पिकासाठी कृषि केंद्रात युरिया खत आणण्यासाठी गेलो पण युरिया खतासोबत इतर अनावश्यक खते औषधे घेतली तरच युरिया देण्या तयार होतात अन्यथा देत नाही.आॕक्टोबर महिन्यात 266 रु.आणले होते.आता मात्र 400ते 450 रु उकळले जात आहेत यामुळे आर्थिक ताण सहन करावा लागत आहे "

- नितिन पवार ,शेतकरी कळमण ता.उ. सोलापूर

"युरिया खताची किंमत 266 रु आहे. यापेक्षा जादा दर अथवा युरिया सोबत अनावश्यक खते औषधे घेण्याची सक्ती होत असल्यास उत्तर सोलापूर कृषि विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्याचे नांव गुप्त ठेऊन संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल"

- मनिषा मिसाळ ,तालुका कृषि अधिकारी उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT