Fast tag sakal
सोलापूर

सोलापूर : फास्ट टॅग स्कॅन होईना, वाहनांच्या रांगेतून सुटका मिळेना

नेटवर्क नसल्याने टोल नाक्यांवर गोंधळाची स्थिती; इंधन व वेळेचाही अपव्यय

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून टोल वसुलीसाठी केंद्र सरकारने ‘फास्ट टॅग’ची सुविधा अमलात आणली. मात्र, फास्ट टॅगला नेटवर्क मिळत नसल्याने स्कॅन होत नाही. स्कॅन होत नसल्याने वाहने थांबून राहतात. यामुळे इंधन वाया जात असून, वेळेचाही अपव्यय होत आहे. फास्ट टॅग स्कॅन होत नसल्यामुळे टोल नाक्यांवरील रांगांतून वाहनधारकांना दिलासा मिळेना.

जिल्ह्यातील अक्कलकोट, गाणगापूर व तुळजापूर आदी ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे टोल नाक्यांवरही वाहनांची दाटी होत आहे. त्यातच सावळेश्वर टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन होण्यात अडचणी येत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. टोल नाक्यांवर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनांवरील फास्ट टॅग स्कॅन होत नसल्यामुळे सावळेश्वर, वरवडे, आणि येडशी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे अनेक नागरिक आपल्या स्वत:च्या वाहनांतून प्रवास करण्यास पसंती देत आहेत. पुणे व मुंबईमधून सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आणि देवदर्शनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील सावळेश्वर येथील टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग ही सावळेश्वर गाव फाटा येथील मुख्य चौकापर्यंत येत आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. टोल नाक्यावरील टोल बूथमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच, कर्मचारीही वाढविण्यात आले आहेत; तरीही वाहनांच्या रांगा कमी झाल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

SCROLL FOR NEXT