sakal
सोलापूर

सोलापूर : मच्छिमारामुळे ड्रायव्हरला मिळाले जीवदान

मच्छिमार बाप्पू नगरे व समाधान नागरे या दोघा पितापुत्रांनी त्या स्विफ्ट गाडीतील ड्रायव्हरला वेळीच पाण्याबाहेर काढल्याने त्या तरुण ड्रायव्हरचा जीव वाचला आहे.

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केतूर (सोलापूर) : करमाळा शहरातील एका स्विफ्ट गाडीच्या ड्रायव्हरला मच्छिमार करणाऱ्या पिता-पुत्रांच्या वेळीच सतर्कतेमुळे जीवदान मिळाल्याची घटना आज सोमवार (ता.27) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डिकसळ पुलाजवळ कोंढारचिंचोली नजीकघडली याबाबतची माहिती अशी की, करमाळा शहरातील तांबोळी यांचे स्विफ्ट लाल रंगाची गाडी सकाळी करमाळा पुण्याकडे निघाली होती.

सकाळी साडेनऊच्या सुमारास एका दुचाकी वाहनाने त्यांना कट मारला असता त्या नादात स्विफ्ट गाडीवरील ड्रायव्हरचा ताबा सुटून सदर गाडी कोंढारचिंचोली नजीक रस्त्याच्या कडेला 90 टक्‍क्‍यांच्या आसपास पाणीसाठा झालेल्या उजनी जलाशयाच्या पाण्यामध्ये पडली. यावेळी तेथे वेळीच उपस्थित असलेले मच्छिमार बाप्पू नगरे व समाधान नागरे या दोघा पितापुत्रांनी त्या स्विफ्ट गाडीतील ड्रायव्हरला वेळीच पाण्याबाहेर काढल्याने त्या तरुण ड्रायव्हरचा जीव वाचला आहे.

सदरची घटना करमाळा पुणे मार्गावरील डिकसळ पुलाच्या अलिकडे करमाळा तालुक्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत स्विफ्ट गाडीमधील ड्रायव्हरला वेळीच जीवदान दिल्याने मच्छिमार करणाऱ्या बाप लेकाचा विशेष कौतुक होत आहे. गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणीही नसल्याने होणारी मोठी दुर्घटना मात्र टळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT