Solapur five people corona died on the today 
सोलापूर

सोलापुरात आजही एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू, 18 रुग्ण वाढले, 583 कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू होण्याची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलग दोन दिवस सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतल्यानंतर आजही तिसऱ्या दिवशी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे अठरा नवीन रुग्ण आढळल्याने सोलापुरातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 583 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.
कर्णिक नगर परिसरातील 80 वर्षीय पुरुषाला 22 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 24 मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरातील 65 वर्षाच्या महिला 30 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. जुना विडी घरकुल परिसरातील 56 वर्षीय महिलेला 20 मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. नइ  जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरमधील 79 वर्षीय पुरुषाला 20 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 21 मे रोजी रात्री आठ वाजता त्यांचे निधन झाले. डोणगाव रोड परिसरातील सलगर वस्ती येथील 65 वर्षीय पुरुषाला 20 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 23 मे रोजी सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज नव्याने आढळलेल्या 18 कोरोनाबाधित  व्यक्तीमध्ये भवानी पेठेतील घोंगडे वस्ती येथील एक पुरुष, शनिवार पेठेतील एक महिला, नीलम नगर येथील दोन महिला, शास्त्री नगर येथील एक पुरुष, रविवार पेठेतील एक पुरुष व  एक महिला,  डोणगाव रोडवरील सलगर वस्ती येथील एक पुरुष, दमानी नगर येथील एक महिला, गंगानगर येथील एक महिला, न्यू पाच्छा पेठ येथील दोन पुरुष, मजरेवाडी येथील एक पुरुष, एमआयडीसी रोडवरील एक महिला, सब जेल सोलापूर येथील एक पुरुष, मुळेगाव रोड येथील एक महिला, पुणे रोड वरील वरद फार्म येथील एक पुरुष, पाछा  पेठेतील एक पुरुष अशा 18 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 227 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या पाच व्यक्तींना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT