solapur protest  sakal
सोलापूर

Solapur: 'अन्न नको पाणी द्या' नगराध्यक्ष बारसकर यांचे बेमुदत आंदोलन

यावेळी रमेश बारसकर म्हणाले, मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी सीना नदी भरून वाहत आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा "पाण्याने भरलेली नदी उषाला आणि कोरड मोहोळ शहर वासीयांच्या घशाला" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजकुमार शहा

Solapur- सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा काही दिवसांवर आली आहे.शिवाय मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत.

अशा परिस्थितीत मोहोळ शहरांमध्ये नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणी पुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.शहरातील माता भगिनी, नागरिकांना पाण्यासाठी ऊनात भटकंती करावी लागत आहे.

"अन्न नको पाणी द्या" अशी म्हणण्याची वेळ शहरातील जनतेवर आली आहे.

त्यामुळे मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आंदोलनाचा पवित्र घेत सोमवार ता 10 मार्च पासून शहराचा पाणीपुरवठा जो पर्यत सुरळीत होत नाही तो पर्यत मोहोळ नगरपरिषद कार्यालया समोर बेमुदत धरणे चक्री आंदोलनास सुरूवात केली आहे.

यावेळी रमेश बारसकर म्हणाले, मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी सीना नदी भरून वाहत आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा "पाण्याने भरलेली नदी उषाला आणि कोरड मोहोळ शहर वासीयांच्या घशाला" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोहोळ नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही अडचण झाली आहे.

ऐन सणासुदीच्या यात्रा काळात शहरांमध्ये अशा पद्धतीची पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्यामुळे आपण हे बेमुदत चक्री धरणे आंदोलन करत असल्याचे बारसकर यांनी सांगीतले. जो पर्यंत या शहराचा पाणीपुरवठा नगरपरिषदे मार्फत सुरळीत होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात मोहोळ नगरपरिषदेचे नगरसेवक अतुल क्षिरसागर, ज्येष्ठ नेते शांतीकुमार अष्टुळ,शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष काकासाहेब देशमुख,दाजी काकडे,गणेश गाढवे,कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य कांतिलाल राऊत,

प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,तन्वीर शेख,निलेश गरड,श्रीकांत गाढवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष राज गरड,

ज्योती क्रांती परिषदेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता पवार,वर्षाताई दुपारगुडे, सुलतान पटेल,सागर गवळी,मुकुंद अष्टुळ ईशान खरखदारी आधी जण उपस्थित होते.

दरम्यान शहराचा पाणीपुरवठा येत्या दोन ते तीन दिवसात सुरळीत करू, अशा आशियाचे लेखी पत्र नगरपरिषद प्रशासनाने बारसकर यांना दिले आहे, परंतु पाणीपुरवठा सुरळीत करा नंतर आम्ही आंदोलन थांबवू या भूमिकेवर बारसकर ठाम आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT