Fuel Sakal
सोलापूर

सोलापूर : कंपनी-पंपचालकांच्या वादात इंधन टंचाईचे संकट

मागणी १२ हजार लिटरची, मात्र कंपन्यांकडून २० हजार लिटरची सक्ती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंप चालकांनी केलेल्या मागणीपेक्षाही जास्त पेट्रोल-डिझेल घेण्याचा दबाव पेट्रोलियम कंपन्यांकडून टाकला जात आहे. मागणीपेक्षाही जास्त इंधन घेण्याची अट कंपन्यांनी पंप चालकांसमोर ठेवल्याने व एक दिवस अगोदर ॲडव्हान्स पेमेंटची मागणी होत असल्यामुळे पंप चालकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. कंपनी व पंप चालकांच्या या वादामुळे मात्र शहर-जिल्ह्याला कृत्रिम इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून पंपचालकांनी केलेल्या मागणीप्रमाणे १२ हजार लिटरच्या टँकरने इंधन पुरवठा होत होता. आता पंप चालकांकडून १२ हजार लिटरच्या टॅंकरची मागणी केली जाते, मात्र कंपन्यांकडून २० हजार लिटर टॅंकरचा पुरवठा होत आहे अन्‌ २० हजार लिटरचाच टँकर घेण्याची सक्ती केली जात आहे. मात्र अतिरिक्त पैशाचे आर्थिक गणित बसविताना पंप चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने कंपन्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे बोलले जात आहे.

तेल उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारकडून दरवाढ मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा त्रास पंपचालकांना दिला जात असल्याची भावना पंप चालकांमध्ये आहे. परिणामी २० हजार लिटरचा टँकर परवडत नसल्याने पंप चालकांकडून खरेदी होत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पंप बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. या समस्येवर वेळीच उपाय न निघाल्यास वाहन चालकांसमोर पेट्रोल-डिझेलची समस्या उद्‌भवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पंप चालकांना मागणीप्रमाणे पेट्रोल- डिझेलचा पुरवठा होत नाही. याची उपलब्धता, त्यावरील प्रक्रिया, स्थिती याविषयी तेल कंपन्या स्पष्ट बोलत नसल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही. सद्य:स्थितीत पेट्रोल-डिझेलचा व्यवहार कंपन्यांना तोट्याचा ठरत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगितले जात आहे. तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना दरवाढ हा एकमेव पर्याय असल्याचे कंपन्या सांगत आहेत, मात्र त्यावर कंपन्या निर्णय घेऊ शकलेल्या नाहीत.

एसटी बसमुळे डिझेल टंचाईचा जावईशोध

एसटी बस आणि खासगी ठेकेदार करीत असलेल्या खरेदीमुळेही डिझेलची मागणी वाढल्याचा जावई शोध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. मात्र, एसटीकडून बाहेरून डिझेल घेण्याचा निर्णय चार महिने जुना आहे. त्यामुळे जिल्ह्यात असे किती टक्के ग्राहक एकदम वाढले की, ज्यामुळे डिझेलचा पुरवठा कमी पडू लागला. या प्रश्नावर कंपनीकडे विचारणा केली असता योग्य उत्तर देण्यास कंपनीकडून नकार देण्यात आला.

सहा जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा

पाकणी येथील पेट्रोलियम कंपन्यांकडून सोलापूरसह इतर पाच जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, दररोज किती पुरवठा होतो यावर त्यांनी बोलणे टाळले. सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना पुरवठा केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ॲडव्हान्स पेमेंटमुळे पंपचालक अडचणीत

पंप चालकांना एक दिवस अगोदर ॲडव्हान्स पैसे द्यावे लागत असल्याने ते अडचणीचे ठरत आहे. शनिवारी बँकांना सुटी असते. त्यामुळे पंप चालकांना शुक्रवारीच पैसे जमा करावे लागतात. शनिवार व सोमवार असे दोन दिवसांचे पैसे एकत्र भरावे लागतात. रविवारी डेपो बंद असतो. २० हजार लिटरचा टॅंकर मागवला तर ४० ते ४६ लाख रुपये भरावे लागतात. शुक्रवारी पैसे भरणे जमले नाही तर अडचण निर्माण होते. सोमवारी सकाळी पैसे भरल्यानंतर कंपनीच्या खात्यात जमा होण्यास वेळ जातो. तोपर्यंत टॅंकर दिला जात नाही.

पंप चालकांना क्रेडिटवर

इंधन देणे झाले बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT