Solapur  sakal
सोलापूर

सोलापूर : हद्दवाढच्या सिटी सर्व्हेसाठी निधीचा अडथळा

महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी दरवर्षी जवळपास १७२ कोटी रुपयांचा निधी मिळतो

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी दरवर्षी जवळपास १७२ कोटी रुपयांचा निधी मिळतो. अपेक्षित उत्पन्नापेक्षाही प्रशासनाचा खर्चच अधिक असल्याने त्या अनुदानातून वेतनाचा खर्च भागविला जातो. पण, आता ते अनुदान १ जुलैपासून बंद होणार असल्याने हद्दवाढ भागाच्या सिटी सर्व्हेसाठी दहा कोटी रुपये आणायचे कुठून, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे. त्यामुळे शासनानेच सिटी सर्व्हेसाठी निधी द्यावा, असा प्रस्ताव पाठविला जाण्याची शक्‍यता आहे.

सध्या शहरातील विशेषत: हद्दवाढ भागातील गुंठेवारीची मोजणी सुरू आहे. खूप वर्षांपासूनचा प्रश्‍न आता मोजणीच्या निमित्ताने मार्गी लागत आहे. आता हद्दवाढ भागातील एक लाख प्रॉपर्टींचा सिटी सर्व्हे होणार असून, त्यासाठी महसूल विभागाने महापालिकेला एक वर्षाची मुदत दिली आहे. त्याचे शुल्कदेखील नागरिकांनाच भरावे लागणार असून, सुरवातीला ती रक्‍कम महापालिका भूमी अभिलेख कार्यालयास जमा करेल. पण, महापालिकेची तिजोरी सध्या रिकामी असल्याने तूर्तास तेवढी रक्‍कम शासनाने द्यावी, अशी मागणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सिटी सर्व्हे झाल्यानंतर हद्दवाढ भागातील नागरिकांचे ३० वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्‍न सुटणार आहेत. त्यांना सात-बारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने बॅंक लोन सहजपणे उपलब्ध होऊ शकते. बनावट खरेदी-विक्रीला चाप बसेल, असा विश्‍वास महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

महापालिका वाढवणार कराची रक्‍कम

शहरातील जकात कर व एलबीटी बंद झाल्याने महापालिकेला दरवर्षी जीएसटी अनुदानापोटी १७२ कोटींचा निधी दिला जात आहे. पण, जीएसटी अंमलात आल्यानंतर पुढील पाच वर्षे जीएसटीचा परतावा मिळेल असे धोरण ठरले होते. ३० जून २०२२ रोजी जीएसटीला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने १ जुलैपासून ते अनुदान मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन १ जुलैपासून शहरातील करात वाढ करू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला 'मंगल मिलन' असे नाव देण्यात आले

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT