Doctor Apron 
सोलापूर

"कोरोना'विरुद्धच्या लढ्यात सोलापुरातील "हा' उद्योगही देणार योगदान!

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : देशाला "कोरोना'मुक्त करण्यासाठी व रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सध्या देशभरातील डॉक्‍टर्स युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी डॉक्‍टरांना सुरक्षा साधनांचीही तितकीच गरज आहे. सध्या जी सुरक्षा साधने आहेत ती पुढे अपुरी पडू शकतात. या सुरक्षा साधनांपैकी कापडापासून निर्मित डॉक्‍टर ऍपरॉन, गाऊन व स्क्रबचा तुटवडा पडण्याअगोदर शासनाने जर परवानगी दिली तर सोलापूर गारमेंट हब म्हणून येथील गारमेंट उत्पादक ही उत्पादने युद्धपातळीवर करून देतील, असा ई-मेल येथील श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने शासनाला केला आहे.

केंद्रीय मंत्रालयांना केला ई-मेल
सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. देशभरातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टरांची पथके अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या जीवघेण्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरांच्या आरोग्याच्या सुरक्षेचाही प्रश्‍न मोठा आहे. त्यासाठी सुरक्षा साधनेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे असून, भविष्यासाठीची तयारी आताच करावी लागणार आहे. डॉक्‍टरांच्या सुरक्षा साधनांपैकी डॉक्‍टर ऍपरॉन, गाऊन व डॉक्‍टर स्क्रब या साधनांची उत्पादने देशातील युनिफॉर्म हब असलेल्या सोलापुरातील अनुभवी गारमेंट उत्पादकांकडून घेतली जातात. सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये गारमेंट उत्पादक देशसेवा म्हणून सेवा देण्यास तयार आहेत. शासनाला आवश्‍यकता भासल्यास या साधनांची उत्पादने युद्धपातळीवर करून दिली जातील, असा ई-मेल गारमेंट असोसिएशनने वस्त्रोद्योग मंत्रालय, लघू उद्योग मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय व आरोग्य मंत्रालयाला केला आहे.

सोलापूर गारमेंट असोसिएशनची तयार

  • चीनने कापडाच्या दरात दुपटीने वाढ केली आहे. सध्या कापड आयात करणे फायद्याचे नाही.
  • उत्पादकांकडे सध्या कापडाची मुबलक उपलब्धता आहे.
  • येथे गारमेंट निर्मितीची सर्व सुविधा उपलब्ध आहे
  • फॅब्रिक शिवणारे अनुभवी व तज्ज्ञ आहेत.
  • भविष्यात गरज भासेल तेव्हा ऐनवेळी उत्पादने कोणी देणार नाहीत.
  • सोलापुरातील उद्योजक देशाच्या सेवेसाठी उत्पादने देण्यास तयार आहेत.
  • उत्पादने घेताना कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.

सध्या देश कोरोनाच्या मोठ्या संकटामध्ये आहे. आम्ही देशाला आश्‍वासन देऊ इच्छितो, की आमचे उत्पादक व कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. रुग्णालये व नर्सिंग गणवेश कार्यक्षमतेने करतात. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने बंद आहेत. परंतु कोणत्याही राष्ट्रीय आवश्‍यक कार्यासाठी आम्ही व आमचे कामगार राष्ट्रीय कार्य म्हणून पुढे यायला तयार आहोत. आम्ही खात्री देतो की सर्व आवश्‍यक खबरदारी घेऊनच उत्पादने घेतली जातील.
- अमित जैन,
संचालक, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT