सोलापूर

सोलापूरला मिळाली पहिली ते आठवीची 94 टक्के पुस्तके 

संतोष सिरसट

सोलापूर ः देशात सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. अशाही स्थितीत बालभारतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तयार केली आहेत. ती पुस्तके वितरणाचे काम सध्या सुरु आहे. बालभारतीच्यावतीने सोलापूर जिल्ह्यासाठी 94 टक्के पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्यावतीने ती पुस्तके केंद्रस्तरावर देण्यात आली आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शाळा सुरु करण्यावर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा टप्याटप्याने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदाचे शैक्षमिक वर्ष 15 जूनपासून सुरु होण्याऐवजी एक जुलैपासून सुरु करण्यावर एकमत झाले आहे. त्यादृष्टीने बालभारतीने पहिली ते आठवीसाठी लागणाऱ्या मोफत पुस्तकांचे वाटप प्रत्येक जिल्ह्याला केले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी 94 टक्के पुस्तके मिळाली आहे. प्लॅस्टिक पेपरचे कव्हर असलेली ही पुस्तके केंद्रातून शाळेमध्ये पोच केली जात आहेत. 

दप्तराचे ओझे कमी करण्याच्यादृष्टीने सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून यंदाच्या वर्षीपासून पहिले ते आठवीसाठी दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकामध्ये थोडाफार बदल केला आहे. सर्व विषयाचे एकच पुस्तक बालभारतीने तयार केले आहे. ती इयत्तानिहाय पुस्तके जिल्ह्यातील केवळ करमाळा तालुक्‍याला देण्यात आली आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्याच्यादृष्टीने सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. 

जिल्ह्यातील पुस्तक मागणीची स्थिती 
मागणी केलेली पुस्तक संख्या ः 23 लाख 78 हजार 144 
मिळालेली पुस्तक संख्या ः 22 लाख 54 हजार 127 
या पुस्तकांसाठी झालेला खर्च ः 10 कोटी 77 लाख 
पुस्तके मिळाल्याची टक्केवारी ः 94.79 टक्के 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT