logo 
सोलापूर

अतिवृष्टीतील नुकसानीपोटी पहिल्या हप्त्यात सोलापूरला मिळाले 294 कोटी 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टी व महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने आज महाराष्ट्रासाठी पहिल्या टप्प्यातील 2 हजार 297 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला 294 कोटी 81 लाख 22 हजार रुपये मिळाले आहेत. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात शासनाची मिळालेली मदत ही अत्यंत तोकडी मानली जात आहे. मनुष्य हानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णता क्षतिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तुंकरिता अर्थ सहाय्य म्हणून 13 कोटी 44 लाख रुपये देण्यात आले आहेत. मृत जनावरांसाठी तीन कोटी तीन लाख 53 हजार रुपयांची मदत सोलापूर जिल्ह्याला मिळाली आहे. 

पूर्णत: नष्ट/अंशत: शेतात पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यासाठी सात कोटी 5 लाख 12 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. शेतीच्या नुकसानीसाठी अर्थ सहाय्य म्हणून 20 कोटी 56 लाख 51 हजार रुपये मिळाले आहेत. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीची मदत म्हणून एसडीआरफच्या 6 हजार 800 रुपये प्रति हेक्‍टर व बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत म्हणून 174 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. वाढीव दराने शेतीपिकासाठी 3 हजार 200 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी सात हजार रुपये प्रति हेक्‍टरी मदत म्हणून सोलापूर जिल्ह्याला 76 कोटी 69 लाख रुपये मिळाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT