drone-farming sakal
सोलापूर

Drone : शेतीत ड्रोनचा वापर होणार कसा? घ्या जाणून....

नॅनो युरियाचा वापर वाढत असताना लवकरच नॅनो डीएपी देखील बाजारात दाखल होणार आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात नॅनो युरियाचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

नॅनो युरियाचा वापर वाढत असताना लवकरच नॅनो डीएपी देखील बाजारात दाखल होणार आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात नॅनो युरियाचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर - नॅनो युरियाचा वापर वाढत असताना लवकरच नॅनो डीएपी देखील बाजारात दाखल होणार आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात नॅनो युरियाचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे. पुढील काळात शेतीमध्ये वाढत्या ड्रोन टेक्नॉलॉजीच्या वापरात ते प्रभावी ठरेल असे मानले जाते.

नॅनो युरियाचा वापर मागील काही दिवसात सातत्याने वाढला आहे. युरियाची पोती वापरण्यापेक्षा लिक्विड स्वरूपात नॅनो युरिया आता वापरला जात आहे. नॅनो युरिया हा पाण्यात मिसळून झाडावर फवारला जातो. झाडे हे खत शोषून घेतात. नॅनो युरिया सध्या इफको कडून उत्पादित केले जात आहे. या पाठोपाठ आता आरसीएफ व एनएफएल या उद्योगांकडून देखील नॅनो युरियाचा वापर होत आहे.

जिल्ह्यात नॅनो युरिया येण्यापूर्वी पारंपरिक पध्दतीचा युरिया वापरला जात होता. जिल्ह्यात १ लाख ६० हजार मे.टन इतक्या प्रमाणात दरवर्षी युरियाचा वापरले जात होते. नॅनो युरियाच्या माध्यमातून पारंपरिक युरियाला नवा पर्याय दिला जात आहे. एका पोत्याला एक नॅनो बॉटलचा पर्याय वापरला जातो. खासगी खत उद्योगांकडून देखील या पद्धतीने उत्पादने पुढील काळात बाजारात येणार आहे.

त्यानंतर आता डीएपी देखील नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून नॅनो डीएपी देखील बाजारात येणार आहे. एप्रिल महिन्यापासून नॅनो डीएपी उपलब्ध होणार आहे. शासकीय उद्योगासोबत एक खासगी उद्योग देखील हे उत्पादन बाजारात आणण्यास तयार झाले आहे. त्यामुळे पुढील काळात खते ही नॅनो स्वरूपात राहतील असे मानले जाते.

या पद्धतीने नॅनो खते बाजारात आली तरी शेतामध्ये ड्रोन तंत्राचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मजुरांची कमतरतेचा प्रश्न देखील सुटण्यास मदत होणार आहे. पण सध्याच्या स्थितीत नॅनो युरिया हे ड्रीपमधून पिकांना देता येत नाही ही सर्वात मोठी अडचण देखील समोर आली आहे.

ठळक बाबी

- युरियाच्या पोत्याला नॅनो युरियाचा पर्याय

- पोत्यांचा वाहतूक खर्च संपणार

- फवारणीचा खर्च वाढणार

- इतर किटकनाशकासोबत देखील फवारणी शक्य

- ड्रीपद्वारे नॅनो युरिया देणे अशक्य

- भविष्यात ड्रोन तंत्राच्या वापरासाठी उपयुक्त संशोधन

नॅनो युरिया हे उत्पादन बाजारात आले आहे. युरियाचे पोते व बॉटलची किंमत या दोन्हींच्या किमतीत तफावत कमी आहे. प्रत्यक्षात वाहतूक खर्च कमी झाला आहे. तसेच ड्रीपने नॅनो युरिया शेताला देता येत नाही ही एक अडचण आहे. ही अडचण दूर झाल्यास ते अधिक चांगले होईल.

- प्रवीण कुसेकर, खत विक्रेते, सोलापूर

यावर्षी म्हणजे एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ अखेरीस जिल्हयात नॅनो युरियाच्या ९० हजार बॉटल्सची विक्री झाली आहे. तसेच नॅनो डीएपी देखील उपलब्ध झाले आहे.

- रवींद्र मोरे, क्षेत्र अधिकारी, इफको, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT