danger  sakal
सोलापूर

सोलापूरचा मौल्यवान पुरातन ठेवा धोक्यात

राजकीय इच्छाशक्तीची अत्यावश्यकता

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कवी राघवन यांनी लिहिलेले सिद्धरामेश्वरांचे चरित्र हिरेहब्बू यांच्या वाड्यातून चोरीला गेले आहे. अद्याप तो ग्रंथ सापडला नसून, या चरित्र ग्रंथाप्रमाणेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील मौल्यवान पुरातन ठेवा धोक्यात आहे. शहरात सुसज्ज अशा वस्तू संग्रहालयाची आवश्यकता असतानाही केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, याचे योग्य संवर्धन न झाल्याने अनेक गोष्टी यापूर्वीच काळाच्या ओघात गडप झाल्या आहेत. आजही सोलापूरकरांनी स्वत: पुढाकार घेऊन अशा वस्तूंचे योग्य संवर्धन न केल्यास हा ठेवा नष्ट होऊ शकतो. सध्या सोलापूरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांत वीरगळ, सतीच्या शिळा यासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे विखुरलेल्या अवस्थेत आहेत. इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार, जिल्ह्यातील ३८० गावांत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरातन मूर्ती आहेत.भंगलेल्या, विहिरीत विसर्जित केलेल्या, सुस्थितीत पण बेवारस पडलेल्या मूर्तींची संख्या १३०० च्या आसपास आहे. हा पुरातन ठेवा नोंद होऊन संवर्धित न झाल्यास बेदखल होऊन त्यांचे महत्त्व ज्ञात नसलेल्या लोकांकडून नष्ट होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारतींपैकी एखादी ऐतिहासिक वास्तू वस्तू संग्रहालयात रूपांतर करावी. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन एक समिती नेमावी. तज्ज्ञ व सक्षम अधिकारी नेमून हा पुरातन ठेवा जतन करणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात वस्तू संग्रहालय आहे. सोलापूरला का नसावे? सोलापुरात नव्याने स्थायिक होणाऱ्या नागरिकांना व पुढच्या पिढीला आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा समजणे आवश्यक आहे.

- डॉ. सीमंतिनी चाफळकर, इतिहासाच्या अभ्यासक

सोलापूरच्या भुइकोट किल्ल्यात सापडलेली पद्मावती देवीची रेखीव मूर्ती आज चंदीगड येथील वस्तू संग्रहालयात आहे. तसेच दोन शिलालेख व दोन द्वारपालांची मूर्ती मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहे. जिल्ह्याचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा धोक्यात आहे. याचे जनत होणे आवश्यक आहे. वेळापूर, कुडलसंगम, पंढरपूरसह अनेक शहरांत व खेडोपाडी अगदी बेवारस स्थितीत पुरातन मूर्ती व वस्तू आहेत. यांचे संवर्धन व्हावे.

- नितीन अणवेकर, इतिहासाचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT