सोलापूरच्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मान्यता Sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूरच्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मान्यता; एकरुख, शिरापूर, आष्टी व बार्शी प्रकल्प

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार ५०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार ५०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी व बार्शी या उपसा सिंचन योजनांसह ७५ प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांच्या उर्वरित कामांसाठी यातील पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी सात हजार ५०० कोटींचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने सोमवारी (ता. ११) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

नाबार्डकडून मंजुरीनंतर यातून सोलापूर जिल्ह्यातील चार उपसा सिंचन योजनांसह ७५ अपूर्ण प्रकल्पांना पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तर उर्वरित दोन हजार ५०० कोटी रुपये १५५ सिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी देण्यात येणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी या तीनही उपसा सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. मात्र, वितरण व्यवस्थेची कामे सुरू आहेत. बार्शी उपसा सिंचन योजनेची वितरण

व्यवस्थेची कामे सुरू असली तरी ती पूर्ण होण्यास जून २०२५ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एकरुख, शिरापूर, आष्टी या योजनांसाठी आणखी ४० ते ५० कोटी तर बार्शी योजनेसाठी आणखी २०० कोटींची आवश्यकता होती. या प्रकल्पांसाठी राज्य सरकारने नाबार्डकडून कर्ज घेण्यास मान्यता दिल्याने ते मार्गी लागतील.

सोलापूर जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी व बार्शी उपसा सिंचन योजनांच्या वितरण व्यवस्थेची कामे सुरू आहेत. राज्य सरकारने या सिंचन योजनांसाठी अर्थसंकल्पातही निधीची तरतुद केली आहे. आता नाबार्डच्या कर्जातूनही निधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनांच्या कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याने ती मार्गी लागतील.

- ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT