Solapur sakal
सोलापूर

Solapur News: मंद्रूप रद्द तर कुंभारी, पंढरपूर ‘एमआयडीसी’ची कार्यवाही संथ

अधिवेशनात जिल्ह्यातील आमदार शांत; कुंभारीसाठी ‘जलसंपदा’ने मागितले २४ कोटी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - कर्जत-जामखेडमध्ये ‘एमआयडीसी’ उभारावी, यासाठी आमदार रोहित पवारांनी विधान भवनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. पण, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व कुंभारी या दोन्ही ‘एमआयडीसी’ अद्याप कागदावरच आहेत. तरीदेखील सत्ताधारी आमदार उद्योगमंत्री उदय सामंतांसमोर अधिवेशनात कोणत्याच लोकप्रतिनिधींनी ‘ब्र’सुद्धा काढला नाही, हे विशेष.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरातील १५२ हेक्टर ५१ आर जमीन प्रस्तावित ‘एमआयडीसी’साठी संपादित केली जाणार आहे. पण, त्या जमिनीतून रेल्वे मार्ग गेला असून अजून काही शेतकऱ्यांची पूर्णतः: संमती नाही. पहिल्या टप्प्यात तेथील जवळपास ५३ एकर (२१.५१ हेक्टर) जमीन संपादित केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १३१ हेक्टर संपादित होईल. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील कार्यवाही सुरु करण्यासंदर्भात ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यालयास त्यासंबंधीचा अहवाल पाच ते सहा महिन्यांपूर्वीच पाठवला आहे. तेथून तो मंत्रालयात जाणार असून त्यानंतर भूसंपादनाची अधिसूचना जाहीर होणार आहे.

पण, अजून त्यासंदर्भातील हालचाली दिसत नाहीत. तो प्रस्ताव ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यालयात तसाच पडून असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे कुंभारी येथील प्रस्तावित ‘एमआयडीसी’च्या कार्यक्षेत्रात काहीशी जलसंपदा विभागाची जमीन आहे. त्याचाही तिढा वरिष्ठ स्तरावरून सुटलेला नाही.

मंद्रूप ‘एमआयडीसी’ एप्रिलमध्येच क्लोज

मंद्रूप येथे ‘एमआयडीसी’ झाल्यास सोलापूर शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी आशा होती. आमदार सुभाष देशमुखांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, शेतकरी विरोधामुळे या ‘एमआयडीसी’चा विषय ६ एप्रिल २०२३ रोजी कायमचा क्लोज करण्यात आला आहे. त्यासंबंधीची अधिसूचना ‘एमआयडीसी’ने जाहीर केली होती.

२४ कोटी माफीचा ‘एमआयडीसी’चा प्रस्ताव

कुंभारी ‘एमआयडीसी’च्या प्रस्तावित जागेत जलसंपदा विभागाचे देखील क्षेत्र आहे. त्याबदल्यात या विभागाने ‘एमआयडीसी’कडे २४ कोटींचा मोबदला मागितला आहे. पण, त्या क्षेत्रात कॅनॉलही नाही आणि मोकळी जमीन आहे. ती रक्कम माफ केल्यास उद्योजकांनाही स्वस्तात जागा देता येईल, अन्यथा २४ कोटी रुपयांमुळे जमिनीचा दर वाढू शकतो.

या बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे प्रस्तावात नमूद आहे. पण, सहा महिने होऊनही त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असेही सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. अशी वस्तुस्थिती असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अधिवेशनात शांत बसल्याने तरूणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Latest Marathi News Live Update : दलित असल्याचे सांगताच रुम नाकारली, वंचितच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

SCROLL FOR NEXT