MLA Kalyanshetti sakal
सोलापूर

Solapur : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : आ. सचिन कल्याणशेट्टी

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : भारतीय जनता पक्षाने आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने जिल्हा भाजपमय करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली असल्याचे येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजूट होत निवडणुका जिंकण्याचा निर्धार आजपासून करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

सेवा सप्ताह, लोकसभा व विधानसभा बूथ सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने सांगोल्यात भारतीय जनता पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, आप्पासाहेब बिराजदार, शिलवंत छिपेकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, राजश्री नागणे, एन.वाय. भोसले, नवनाथ पवार, गजानन भाकरे, दुर्योधन हिप्परकर, विजय बाबर, विजय इंगोले, विलास होनमाने, बाळाप्पा येलपले, प्रविण जानकर, नागेश जोशी, सुरेश इंगोले, लक्ष्मण येलपले, शिवाजी आलदर, गणेश घाडगे, सिध्देश्वर गाडे, मोहन साळुंखे, अण्णा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरण करून सज्ज होऊन कामाला लागावे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे. भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. यावेळी चोपडी गावातील डॉ.धनाजी पारेकर यांचा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थतीत भाजप मध्ये प्रवेश झाला.यावेळी शशिकांत चव्हाण, संभाजी आलदर, डॉ. विजय बाबर, शिवाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

गावागावात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर...

तालुक्यातील भाजपच्या सर्व ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत असल्याने सांगोल्यात भाजपचा गड मजबूत होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज आहेत. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहावे. लोकहिताचे उपक्रम राबवून गावागावात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT