Ram Satpute Net Worth
Ram Satpute Net Worth Esakal
सोलापूर

Ram Satpute Net Worth: सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार सातपुतेंकडे ५७ लाखांची मालमत्ता; तर 'इतक्या' कोटींचं आहे कर्ज

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोलापूर: सोलापूरचे लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज काल भरला. त्यांची एकूण मालमत्ता ही ५७ लाख आहे. ३६ वर्षीय आमदार सातपुते हे पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांची व पत्नी संस्कृती सातपुते यांची एकूण ३७ लाख ४४ हजार जंगम तर १९ लाख ७५ हजार स्थावर मालमत्ता आहे.

त्यांच्या नावे पिस्तुलाचा परवाना असून, त्याची किंमत दोन लाख ४९ हजार आहे. तसेच मांडवे येथे त्यांच्या नावे १४ लाखांची दोन एकर २९ आर तर पत्नीच्या नावे एक एकर दोन आर शेती आहे. त्यांच्याकडे बुलेटसह पाच दुचाकी आहेत. तसेच १६ तोळे सोने आहे.

जंगम मालमत्ता- राम सातपुते यांच्याकडे २०१९ मध्ये १० लाख ३४ हजार इतकी होती ती आता ३७ लाख ४४ हजार इतकी झाली आहे.

स्थावर मालमत्ता- राम सातपुते यांच्याकडे २०१९ मध्ये ०० इतकी होती ती आता १९ लाख ७५ हजार इतकी झाली आहे.

सोने - २०१९ मध्ये त्यांच्याकडे १३ तोळे सोने होते तर आता १६ तोळे आहे.

वाहने - २०१९ मध्ये त्यांच्याकडे ५ होती तर आत्ताही त्यांच्याकडे ५ वाहने आहेत.

कर्ज - २०१९ मध्ये त्यांच्यावर ७५ हजार इतके कर्ज होते. ५९ लाख ९२ हजार इतके आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT