solapur lok sabha election 15 nomination files praniti shinde politics Sakal
सोलापूर

Solapur Lok Sabha Poll : सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेंसह १५ अर्ज; माढ्यासाठी १३ अर्ज दाखल

सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी (ता. १८) काँग्रेस उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माढा लोकसभा मतदार संघासाठी ११ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी (ता. १८) काँग्रेस उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माढा लोकसभा मतदार संघासाठी ११ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (शुक्रवार, ता. १९) अंतिम मुदत आहे. माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातील सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. शेवटच्या दिवशी कोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार शिंदे यांनी गुरुवारी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चारही अर्ज काँग्रेसच्या वतीने आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांनी दुसरा अर्ज दाखल केला आहे.

या शिवाय अभिमन्यू आठवले, कुमार लोंढे, रवी म्हेत्रे, भन्ते नागमूर्ती कुरणे, मनोहर कोरे, कविता श्री वेंकटेश्वरा महास्वामीजी ऊर्फ दीपक, योगेश पवार, अमोल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. योगेश पवार हे सर्वसाधारण असून त्यांनी राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माढ्यासाठी अपक्ष उमेदवार नानासाहेब रामहरी यादव, राहुल शशिकांत सावंत, अनिल भगवान शेडगे, नंदू संभाजी मोरे, अमोल मधुकर करडे, काशिनाथ किसन देवकते, शहाजान पैगंबर शेख, रोहित रामकृष्ण मोरे, गिरीश प्रभाकर शेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उद्या छाननी

लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (ता. २०) होणार आहे. छाननीमध्ये कोणाचे अर्ज अवैध होतात, कोणाचे अर्ज वैध ठरतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारची (ता. २२) मुदत असणार आहे. सोमवारी माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातील लढती स्पष्ट होणार आहेत. या दोन्ही मतदार संघात मुख्य पक्षांच्या उमेदवारांशिवाय अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT