Solapur  sakal
सोलापूर

Solapur : पत्त्यांची जादू गिनीजबुकात ! सोलापूरच्या विद्यार्थ्याने केला अनोखा जागतिक विक्रम

मानवी लक्ष्याच्या दिशेने ६६ पत्ते फेकण्याचा सलग तीन वेळा जागतिक विक्रम

सकाळ वृत्तसेवा

Solapur - सोलापूरचा रहिवासी असलेला आदित्य कोंडमूर हा तरुण जादूच्या कलेचे शिक्षण घेत आहे. त्यासोबत त्याला कार्ड फेकण्याच्या छंदाने जागतिक विक्रमाकडे लक्ष वेधले. त्याने यापूर्वी पत्ते फेकण्याबाबतचे दोन जागतिक विक्रम नोंदवले आहेत. त्याने यापूर्वी ११७ पत्ते एका लक्ष्याच्या दिशेने सर्वाधिक संख्येने फेकण्याचा विक्रम गिनीज बुकात नोंदवला. त्यानंतर त्याने ११७ पत्ते सर्वाधिक अचूक पद्धतीने लक्ष्याच्या दिशेने फेकण्याचा विक्रम केला.

त्यानंतर त्याने विजयपूर येथे मानवी लक्ष्याच्या दिशेने एका मिनिटात सर्वाधिक पत्ते फेकण्याचा विक्रम केला. त्याने ६६ पत्ते मानवी लक्ष्याभोवती फेकण्याचा विक्रम केला. त्याने हा विक्रम करताना या पूर्वीचा सर्वात जास्त पत्ते फेकण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे. त्याने हा विक्रम कर्नाटकातील विजयपुरा येथील उदयश्री स्पोर्ट्स अकादमीमध्ये केला होता.

या विक्रमाची नोंद घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसने मंगळवारी (ता.२) सन्मानपत्र पाठवून ही घोषणा केली आहे. यापूर्वीचा विक्रम हा युएसएच्या रिक स्मिथ ज्युनिअरच्या नावाने आहे जो की, ५६ पत्त्याचा होता. आता आदित्य कोंडमूरचा विक्रम गिनीज बूकमध्ये नोंदवला गेला आहे. गिनीज बूकने त्यास नव्या विक्रमाच्या नोंदीचे सन्मानचिन्ह पाठवून त्याचा गौरव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT