kedar jadhav Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: जाधववाडीचे माळरान ते आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटचे मैदान

सोलापूरच्या केदार जाधवचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा

माढा : सोलापूर जिल्ह्यातील जाधववाडी (माढा) सारख्या ग्रामीण भागात क्रिकेट खेळलेल्या केदार जाधवने भारतीय संघात स्थान मिळवत अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाला अनेक सामन्यांत यश मिळवून दिले असून केदार जाधवची कारकीर्द ही युवकांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यास प्रेरणादायी ठरत आहे.

केदार जाधव यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील जाधववाडी (माढा) आहे. आपल्या कुटुंबियांसोबत अनेक दिवस केदार जाधवने जाधववाडी येथे घालवले आहेत. जाधववाडी येथील बालमित्रांबरोबर त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.

जाधववाडीतील शेतातील व गावाशेजारी ओबडधोबड मैदानावर केदार जाधव क्रिकेट खेळले आहेत. गावाकडे सुटीसाठी आल्यानंतर बालपणीच्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळणे हा केदार जाधव यांचा आवडता छंद होता.

केदार जाधवचे प्रारंभिक शिक्षण पुण्यातल्या एमआयटी हायस्कूल येथे झाले. बारावीचे शिक्षण यशवंतराव मोहिते महाविद्यालयात तर बीकॉमचे शिक्षण कोथरूडमधील श्रीमती सुधाताई मांडके महाविद्यालयात घेतले.

बीकॉमची पदवी घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या क्रिकेट करिअरला सुरवात झाली. शालेय जीवनात शिक्षक, पालक यांच्याकडून आपल्या आवडीचा छंद असलेल्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळाल्याने केदार जाधव यांनी क्रिकेटमध्ये करिअर केले.

वडील महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले तर घराची संपूर्ण जबाबदारी आई व पत्नी सांभाळते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या केदार जाधव यांनी मोठ्या कष्टाने क्रिकेटमध्ये आपलं करिअर केले आहे.

केदार जाधव हा अष्टपैलू खेळाडू असून भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी - ट्वेंटी व एकदिवसीय सामने व भारतीय अ संघाकडून खेळण्याबरोबरच चेन्नई सुपर किंग, दिल्ली डेअर डेव्हिल्स, कोची टस्कर्स चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडून आयपीएल क्रिकेट खेळला आहे. २००७ मध्ये केदारने प्रथम श्रेणी सामने खेळण्यास सुरवात केली.

लक्षवेधी

७३ एकदिवसीय सामन्यात १०१.१६ च्या स्ट्राईक रेटने १३८९ धावा.

१५५ टी-२० सामन्यात १२८.४ च्या स्ट्राईक रेटने २४८४ धावा

९३ आयपीएल सामन्यात १२३.२ च्या स्ट्राईक रेटने ११९६ धावा

एकदिवसीय सामन्यात २७ बळी

आयपीएल सामन्यात ३० बळी

एकदिवसीय सामन्यात घेतले ३३ झेल.

क्रिकेट अकादमीतून उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक व चांगला क्षेत्ररक्षक म्हणून केदार जाधवने अष्टपैलू कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असूनही ग्रामीण भागाची जाण केदार जाधवला आहे.

प्रथम श्नेणी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अतिशय उंचावलेली आहे. मागील दोन वर्षापासून पुण्यातील कोथरूड येथे क्रिकेट ॲकॅडमी सुरू करून केदार जाधव यांनी उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT