yallamadevi and shri jamdagni rushi sakal
सोलापूर

Solapur : मराठवाड्यातही होत नाही असा सोहळा! यल्लमादेवी जमदग्नी ऋषींचा कल्याणोत्सव उत्साहात

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूर्वभागातील दाजी पेठ येथील यल्लम्मा मंदिरात श्री यल्लम्मादेवी आणि श्री जमदग्‍नी ऋषी यांचा कल्याणोत्सव हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूर्वभागातील दाजी पेठ येथील यल्लम्मा मंदिरात श्री यल्लम्मादेवी आणि श्री जमदग्‍नी ऋषी यांचा कल्याणोत्सव हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.

दु. १२. २३ मिनिटांनी श्री यल्लम्मादेवी आणि श्री जमदग्‍नी ऋषी यांचा कल्याणोत्सव कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. उपस्थित भाविकांनी षडाक्षरीवर कल्याणोत्सव अक्षता वाहिल्या. या कल्याणोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

तत्पूर्वी ध्वज पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. ध्वजपूजन मनोहर इगे, गंगा पूजन रामुलू जोरीगल यांच्या हस्ते पार पडले. मूळ मूर्तीचे अभिषेक सिद्राम कोनापूरे, चंद्रकांत बोगा, रमेश ईराबत्ती यांच्या हस्ते पार पडले. नवग्रह पूजन गोविंद कोनापूरे या दांम्प्त्यांच्या हस्ते झाला.

विवाहसोहळ्यासाठी वधू पक्षाकडून अंबादास कोनापूरे दाम्प्त्यांनी तर वर पक्षाकडून श्रीनिवास मिठ्ठा या दाम्पत्यांनी यजमानपद स्वीकारले. कन्या पूजन मल्‍लिकार्जून कोनापूरे यांच्या हस्ते पार पडले. सायंकाळी साडेसात वाजता मंदिराभोवती पालखी सेवा प्रदक्षिणा पार पडली. यानंतर रात्री ८ वाजता नक्षत्र आरती व शयनसेवा कार्यक्रम झाले.

महाप्रसादाचे नेटके आयोजन

भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेताना त्रास होऊ नये यासाठी २०० फूट लांब मंडप तयार करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळापासून महाप्रसादाच्या ठिकाणी रांगेने सोडण्यात आले. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतरही नेटक्या नियोजनामुळे महाप्रसादाचा लाभ घेणार्‍या भाविकांना कोणतीही अडचण आली नाही.

उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना

मंदिराबाहेर कल्याणोत्सव कार्यक्रमासाठी मोठा मंडप करून स्टेजवर श्री यल्लम्मादेवी आणि श्री जमदग्‍नी ऋषींच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अक्षता सोहळा या उत्सवमूर्तीऐवजी षडाक्षरीवर टाकण्यात आल्या. यावेळी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. मंदिरात फुलांनी सजावट करून गाभार्‍यातील यल्लम्मादेवीच्या मूर्तीला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आल्याने मंदिरातील भक्तीमय वातावरणात प्रसन्नतेची अधिक भर पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT