Market Yard Sakal
सोलापूर

रोख पैसे नाहीत, धनादेश घ्या! सोलापूर बाजार समितीतील अडत्यांचा नियम

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील चार दिवसांत साडेचार हजार गाड्या कांदा आवक झाला. समाधानकारक दर मिळत असल्याने आवक वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून चार दिवसांत तब्बल चार हजार 439 गाड्यांची आवक झाली आहे. अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्याने आवक वाढल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. कांद्याला प्रतिक्‍विंटल सरासरी एक हजार 400 रूपये ते कमाल अडीच हजारांपर्यंत दर मिळू लागला आहे. (Solapur Market Yard)

सोलापूर जिल्ह्यासह नगर, नाशिक, पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातून कांद्याची मोठी आवक सोलापूरकडे येत आहे. कलबुर्गी, बागलकोट व विजयपूर येथूनही कांद्याची मोठी आवक आहे. शुक्रवार ते शनिवारी (ता. 29) बाजार समितीत तब्बल एक हजार 267 गाड्या कांद्याची आवक (एक लाख 26 हजार 760 क्‍विंटल) झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. पाच हजार 299 शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी आणला.

सोलापूर बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातून कांद्याची मोठ्या प्रमाणावर सोलापूर बाजार समितीत कांदा येऊ लागला आहे. बाजार समितीत दररोज पाचशे ते साडेपाचशे गाड्यांचाच लिलाव होत होता. परंतु, आता आवक वाढल्याने आलेल्या कांद्याचा दररोजच्या दररोज लिलाव केला जात आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कांदा लिलाव होतो. कांद्याची आवक वाढल्याने रोखीने पैसे देणे शक्‍य नसल्याने धनादेश (चेक) जात असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येत आहे. परंतु, धनादेश देण्याची पद्धत सहकार कायद्यात कुठे आहे, याचे उत्तर बाजार समितीकडे नाही.

रोख पैसे नाहीतच, 15-20 दिवसांचा धनादेश

तीन- साडेतीन महिन्यांपर्यंत खर्च करून सांभाळलेल्या कांद्याची सुरवातीला बियाणे खरेदी करून लागण करणे, फवारणी, खते-औषधे, काढणी, चिरणे आणि बारदाना (पोती) यासाठी मोठा खर्च होतो. संबंधितांचे पैसे देण्यासाठी व पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना रोख बिलाची अपेक्षा असते. परंतु, बाजार समितीतील अडत्यांकडून 15 ते 20 दिवसांचा धनादेश दिला जात आहे. पाच ते दहा हजार रुपयांची उचल दिली जाते, मात्र संपूर्ण बिल दिले जात नसल्याची ओरड शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

Hospital Fire: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूने भंडाऱ्याची ‘ती’ काळरात्र पुन्हा ताजी; २०२१ मध्ये १० बालकांचा आगीत मृत्यू

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

SCROLL FOR NEXT