आ.समाधान आवताडे  sakal
सोलापूर

Solapur : मातृलिंग गणपतीच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी उपलब्ध करू आ.आवताडे

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, कल्लाप्पा पाटील,जालिंदर व्हनुटगी,गंगाधर

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : सिद्धापूर मातुर्लिंग देवस्थानच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करू मात्र त्यासाठी आपला पाठपुरावा व आलेल्या निधीचा योग्य वापर आवश्यक असल्याची प्रतिपादन आ.समाधान आवताडे यांनी केले

तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते.दरवर्षी क्रिकांतीच्या दुसय्रा दिवशी सुर्योदया ते सुर्यास्त पर्यंत भरणाय्रा एक दिवशीय यात्रेची महापुजा आ.समाधान आवताडे व त्यांच्या पत्नी अंजली अवताडे यांच्या शुभहस्ते विधीवतपणे करण्यात आली.या पुजेसाठी आ.विजयकुमार देशमुख,स्वाभिमानी जिल्हा नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर भाजपा जिल्हा संघटन चिटणीस शशिकांत चव्हाण प्रा येताळा भगत नितीन नकाते, प्रणव परिचारक,बापूराया चौगुले, अनिल बिराजदार,

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, कल्लाप्पा पाटील,जालिंदर व्हनुटगी,गंगाधर काकाणकी,विजयकुमार भरमगोंडे,विजय पाटील,शिवराज पाटील,सिध्दाराम व्हनुटगी,संतोष सोनगे,पो. नि. रणजीत माने,आदीसह सिध्दापूर ग्रामस्थ व ट्रस्ट चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की, भाविकांना चांगल्या सोयी सुविधा देता यावा म्हणून आपण विकासकामाच्या मागण्या केल्या मात्र एकदा मागणी केली की झाले असे नाही त्यासाठी आपला देखील पाठपुरावा देखील आवश्यक आहे.मागेल तेवढा निधी उपलब्ध करू,

त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अडचणीसाठी मी स्वत जाईन.तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मंजूर निधीही शिल्लक आहे.या निधीतून केलेल्या वास्तूचा वापर देखील होणे आवश्यक आहे वास्तू खराब झाल्यास त्याच्या दुरुस्ती करणे अडचणीचे ठरत आहे.म्हणून कामे चांगली होण्यासाठी लक्ष द्यावे, नदीवरील पुलासाठी मी व आ सुभाषबापूंचे प्रयत्न सुरू आहेत. भाविकांना कोणत्या नावीन्यपूर्ण सुविधा देता येईल

यासाठी लक्ष देऊच तसेच या भागातील लोकांचे द्राक्ष व ऊस शेतीतील उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी या भागातील शेतकय्रानी देखील अभ्यास करणे गरजेचे आहे.आ.अवताडे ने उपस्थित केलेल्या लक्षवेधीतील क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर सिद्धापूर येथील जमिनीचा समावेश त्यामध्ये करावा अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल बिराजदार यांनी केली

सिद्धापूर पासून 3 कि.मी. अंतरावरील गणपतीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.परंतु निधी कमतरतेमुळे भाविकाना पुरेशा सुविधा देताना सिध्दापूर ग्रामपंचायतीवरही ताण पडत आहे.स्व.आ. भालकेनी तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळवून दिला. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे यात्रा कालामध्ये चांगल्या सुविधा यात्रेकरू व व्यापाय्राना देणे व या परिसराचा विकास करणे आदी साठी कुडल संगमच्या धर्तीवर विकास करण्याची आश्वासन तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी 2019 ला दिले होते

राज्यातील सत्ता बदल व दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी यात्रा मोठी भरली नसल्याने त्यांचे आश्वासन हवेत गेले असले तरी या ठिकाणी मा.आ.प्रशांत परिचारकाच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम झाले. मात्र आता राज्यातील, केंद्रातील सत्तेबरोबर पालकमंत्री एकाच पक्षाचे असल्यामुळे आ.समाधान अवताडे यांनी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT