बैलगाड्यांसह मंद्रूपहून मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्याकडे कूच केली.  sakal
सोलापूर

Solapur : मंद्रूपच्या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’कडे कूच

‘एमआयडीसीसाठी आरक्षित क्षेत्र’ नोंद कमी करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कुसूर : मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर ‘एमआयडीसीसाठी आरक्षित क्षेत्र’ अशी झालेली नोंद कमी करावी, यासाठी मंद्रूपच्या शेतकऱ्यांनी आज (मंगळवारी) बैलगाड्यांसह मंद्रूपहून मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्याकडे कूच केली. मोर्चा घेऊन शेतकरी त्यांच्या शेतातून आज दुपारी ११.४५ वाजता मुंबईकडे निघाले आहेत.

मंद्रूप येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने ‘एमआयडीसीसाठी आरक्षित’ अशी नोंद झाली आहे. त्याच्या विरोधात गेल्या पाच महिन्यांपासून मंद्रूपच्या तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

पण आश्वासनापलीकडे ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शासनाच्या विरोधात मंद्रूपचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता, त्यानुसार आज पाच बैलगाड्यांसह महिला शेतकरी देखील मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चात सामील झाल्या आहेत.

या मोर्चात आठ महिन्यांच्या अनवी कुंभार या चिमुरडीला घेऊन महिला शेतकरी पाई चालत निघाली आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह प्रशासनातील उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहसचिव संजय देगावकर, औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेऊन नोंद कमी करण्याची विनंती केली; पण उतारावरील नोंद कमी करण्यात आलेली नाही.

म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या सरकारी निवासापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रवीण कुंभार, गजानन शेंडगे, बाबू मेंडगुदले, अनिल मेंडगुदले, बाळू शेंडगे, मलकारी जोडमोटे, राम कुंभार, बसवराज कुंभार, मलकारी गुंजाटे यांच्यासह महिला व दहा वर्षांच्या आतील लहान बालकांसह शंभर शेतकरी या मोर्चात सामील झाले आहेत.

शासनाचा निषेध करत बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ

शेतकरी दुपारी पावणेबाराच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन मंद्रूप येथील मळसिद्ध मंदिरात आले. तेथे नारळ वाढवून तलाठी कार्यालयासमोर आले व तलाठी कार्यालयाला नारळ वाढवून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करीत बोंब मारली. बैलगाड्यांसह मंद्रूप तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना नारळ देऊन बैलगाडी मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT