आमदार शिंदें sakal
सोलापूर

सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार

आमदार शिंदेंचा विश्‍वास डिजिटल सभासद नोंदणीसाठी बैठक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: राजकारणात अनेक लाटा येतील आणि जातील. पण, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी शहरातील तिन्ही विधानसभेत जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. सभासद नोंदणीच्या माध्यमातून शहर पिंजून काढणार असून आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या कामाच्या बळावर व नवीन युवा सदस्यांच्या सहभागाने महापालिकेवर तिरंगा फडकाविणार असल्याचा विश्‍वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्‍त केला.

शहरातील शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि शहर मध्य या तिन्ही विधानसभा मतदारसंघात डिजिटल सभासद नोंदणी अधिकाधिक व्हावी, असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले. दरम्यान, डिजिटल सभासद नोंदणीसंदर्भात आयोजित बैठकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्‍वास दिला. यावेळी सर्वाधिक सभासद नोंदणी केल्याबद्दल नगरसेविका फिरदोस पटेल, सुशील बंदपट्टे, सागर शहा, कुणाल गायकवाड यांचा सत्कार झाला.

याप्रसंगी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, गटनेते चेतन भाऊ नरोटे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, तौफीक हत्तुरे, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, प्रदेश चिटणीस ॲड. मनीष गडदे, प्रा. नरसिंह आसादे, किसन मेकाले, अरुण साठे, देविदास गायकवाड, उदय चाकोते, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तीकोंडा, योगेश मार्गम, विवेक कन्ना, हारून शेख, मधुकर आठवले, शौकत पठाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT