solapur modi cemetery condition municipal corporation Sakal
सोलापूर

Solapur News : सोलापुरात मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी उन्हात उभे राहण्याची वेळ, महापालिकेचे दुर्लक्ष

मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतीक्षालय नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना रणरणत्या उन्हात अंत्यविधी होईपर्यंत थांबावे लागत आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतीक्षालय नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना रणरणत्या उन्हात अंत्यविधी होईपर्यंत थांबावे लागत आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

सोलापुरातील मोठ्या स्मशानभूमींपैकी एक म्हणून मोदी स्मशानभूमी ओळखली जाते. या ठिकाणी जुळे सोलापूर, सैफुल, दमाणी नगर, लक्ष्मी-विष्णू चाळ, सुपर मार्केट, भैय्या चौक, रामलाल चौक, फॉरेस्ट आदी भागातील नागरिक आप्तेष्टांच्या अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीत येतात.

मात्र या ठिकाणी अंत्यविधीसाठी हजर राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रतीक्षालय नसल्याने नागरिकांना उन्हात अथवा झाडाखाली आसरा घेत थांबावे लागत आहे. या स्मशानभूमीत दहनभूमी आणि दफनभूमी तसेच विद्युतदाहिनी लगतच असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

अशातच या नागरिकांना उन्हात अथवा पावसातही आसरा घेण्यासाठी प्रतीक्षालय नसणे अडचणीचे होत आहे. महापालिका प्रशासनाने या स्मशानभूमीत लवकरात लवकर प्रतीक्षालय बांधून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे.

ठळक बाबी

  • स्मशानभूमीत हात-पाय धुण्यासाठी आणखी एक पाणी टाकी आवश्यक.

  • लोखंडी प्रवेशद्वार गायब.

  • बाहेरील हातपंप नादुरुस्त.

  • बाकड्यांवर दिवसा सर्रास दारुड्यांची बैठक.

  • किमान दोन सुरक्षारक्षकांची नियुक्तीची गरज.

स्मशानभूमीत सलगर वस्ती, लक्ष्मी विष्णू चाळ, दमानी नगर भागातील मृत नागरिकांचा अंत्यविधी करण्यात येतो. अशावेळी आलेल्या नातेवाइकांना उभारण्यासाठी या ठिकाणी वेटिंग शेड नाही. त्यामुळे अंत्यविधी होईपर्यंत उन्हात अथवा झाडाचा आसरा घेऊन नागरिक उभे असतात. या ठिकाणी वेटिंग शेड बांधणे गरजेचे आहे

- अभिजित ननवरे, नागरिक

अनेक दिवसांपासून या ठिकाणी वेटिंग शेड बांधण्याची मागणी असताना देखील महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांची उन्हाळ्यात व पावसाळ्यात गैरसोय होते. हातपाय धुण्यासाठी आणखी एक पाणी टाकी बांधणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षारक्षक देखील आवश्यक आहे. त्यामुळे व्यसन करण्यासाठी येणारे लोक धजावणार नाहीत.

- किरण मोरे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

ASHA MOVIE REVIEW: विषय, कथा, मांडणी सुंदर पण प्रेक्षकांना भावेल का? कसा आहे रिंकू राजगुरूचा 'आशा' चित्रपट?

Latest Marathi News Live Update : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

SCROLL FOR NEXT