Solapur Sakal
सोलापूर

Solapur : मणिपूर घटनेतील दोषीवर कारवाई करा मोहोळ 'अंनिस'ची मागणी

त्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध नोंदवत ...

राजकुमार शहा

मोहोळ - मणिपूर घटनेतील दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेच्या वतीने करण्यात आली.

अडीच महिन्या पेक्षा अधिक कालावधी पासून मणिपूर राज्यात जातीय व धार्मिक जाळपोळ, हिंसाचार महिलांची नग्न धिंड काढणे असे प्रकार सुरु आहेत .

आशातच इंफाळ पासून पस्तीस किलोमीटर अंतरावरील कंगपोकपी जिल्ह्यात एका जातीय समुदायाने तेथील अदिवासी समुदायाच्या दोन महिलांची नग्न धिंड व त्यावेळी अनेकांनी त्यांच्याशी केलेले घृणास्पद कृत्य , महिलांचा भाऊ आणि वडिलांची ही हत्या आणि बलात्कार हे मानव जातीला न शोभणारे कृत्य त्या समुदायानी केले.

त्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध नोंदवत आहे व त्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

हे निवेदन मोहोळचे तहसीलदार भालचंद्र यादव यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. यावेळी मोहोळ शाखेचे अध्यक्ष प्रा . श्रीधर उन्हाळे, कार्याध्यक्ष मोहन व्यवहारे ,प्रधान सचिव संजय भोसले ,राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद ,जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे ,अॅड विनोद कांबळे , गणेश सिरसट ,मोहन कादे ,बिरमल खांडेकर ,संदिप साळवे मानाजी थोरात ,राजेंद्र माटे , रमेश आदलिंगे आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Puri: जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर घारींचा थवा; स्थानिकांनी ओळखला धोक्याचा इशारा, 'ती' भविष्यवाणी...

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधानभवनाकडे मोर्चा

Dhurandhar Movie Location: धुरंधर चित्रपटाची लोकेशन करा एक्सप्लोर आणि बजेटमध्ये ट्रिपचा अनुभव घ्या...

Mumbai Metro: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामांना वेग गती! शंभराव्या गर्डरची उभारणी

Promo : समर-स्वानंदी हळूहळू एकमेकांच्या पडतायेत प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता माती खाऊ नका"

SCROLL FOR NEXT