Fire  sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ येथील किराणा दुकानाला लागली आग ; लाखोचे नुकसान

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील शिवाजी चौकातील एका किराणा दुकानाला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

राजकुमार शहा

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील शिवाजी चौकातील एका किराणा दुकानाला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत लाखो रुपयांच्या किराणा मालाचे नुकसान झाले, त्यात गोड तेल व खोबरे तेल यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

आग कशाने लागली हे समजू शकले नाही मात्र शॉर्टसर्किटनेच आग लागल्याची चर्चा घटना स्थळावर होती. दरम्यान चौकातच हे दुकान असल्याने दुकानातील माल बाहेर काढण्यासाठी व आग विझवण्यासाठी नागरिकांनी मोठी मदत केली.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार, पुळुज येथील दिलीप वाघमोडे यांचे टाकळी सिकंदर येथील शिवाजी चौकात किराणा मालाचे ठोक व किरकोळ विक्रीचे दुकान आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाघमोडे हे दुकान उघडत होते.

त्यावेळी मोठ्या प्रमाणात धूर व आगीच्या ज्वाळा दुकानातून येऊ लागल्या. वाघमोडे यांना काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृश्य पाहतात चौकात असलेल्या नागरिकांनी आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केला. तसेच भीमा साखर कारखाना व पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशामक यंत्रणेने आग आटोक्यात आणली.

या घटनेमुळे वाघमोडे यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. मात्र ही घटना पाहिल्याने वाघमोडे हे घाबरलेल्या अवस्थेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT