002Child_Mask_0_2.jpg 
सोलापूर

सोलापूरची लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल ! एकाच दिवशी 256 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीणच्या तुलनेत आता शहरातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मागील दोन-अडीच महिन्यात प्रथमच आज शहरातील 779 संशयितांमध्ये 109 तर ग्रामीणमध्ये दोन हजार 758 संशयितांमध्ये 147 रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीणमध्ये दोघांचा तर शहरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढत असल्याने काही जिल्ह्यांनी लॉकडाउन केला असून सोलापूरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरु असल्याची चर्चा आहे. परंतु, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोना कमी होऊन तशी वेळ येणार नाही, असाही विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 
 

शहरात रूग्ण आढळलेली ठिकाणे
मुरारजी पेठ, वैष्णवी नगर, राजस्व नगर, माशाळ नगर, निर्मल सोसायटी, रामलिंग नगर, तुलसी विहार अपार्टमेंट, जाई-जुई नगर (विजयपूर रोड), संजय नगर (कुमठा नाका), बापूजी नगर (सदर बझार), शिक्षक हौसिंग सोसायटी, गुरुनानक नगर, वेणूगोपाळ नगर, आयोध्या नगर (बुधवार पेठ), भवानी पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, वृदांवन सोसायटी, विशाल नगर, सिंधु विहार, गणेश नगर, गणेश सोसायटी (जुळे सोलापूर), सेवन हेवन अपार्टमेंट (रामलाल चौक), शिवाजी नगर, श्रध्दा अपार्टमेंट (बाळे), विकास नगर, दक्षिण कसबा, सोनी नगर (दमाणी नगर), केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्र, अवंती नगर, स्वामी विवेकानंद नगर, सवेरा नगर, द्वारका नगर (सैफूल), अश्‍विनी कॉलनी (एसआरपी कॅम्प), गुरूकृपा अपार्टमेंट (नेहरू नगर), राजेश नगर (होटगी रोड), शिवाजी नगर (मोदी), दक्षिण सदर बझार, कॅम्प शाळेजवळ (दक्षिण सदर बझार), होटगी रोड, कल्याण नगर भाग-दोन, नवोदय नगर, राघवेंद्र नगर (मजरेवाडी), सुनिल नगर (कामगार वसाहत), निलम नगर, रामलिंग सोसायटी, न्यू बुधवार पेठ, जोडभावी पेठ, घाटे बिल्डिंग (रंगभवन), विकास नगर (होटगी रोड), उत्तर कसबा, अभिमानश्री नगर, गुजराती मित्र मंडळजवळ (मुरारजी पेठ), कोनापूरे चाळ (रेल्वे लाईन्स), सुयोग सोसायटी (डफरीन चौक), क्षमा अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), इरण्णा वस्ती (भूषण नगर), सोनी नगर, सोनिया नगर, विडी घरकूल, मोदी (रेल्वे कॉलनी), रेल्वे कॉलनी (सात रस्ता) आणि कुरडे प्लाझा (दमाणी नगर) याठिकाणी नवे रूग्ण आढळले आहेत.

ग्रामीणमध्ये आज अक्‍कलकोटमध्ये तीन, बार्शीत 40, करमाळ्यात 17, माढा व माळशिरसमध्ये प्रत्येकी 18, मंगळवेढा व उत्तर सोलापूर तालुक्‍यात प्रत्येकी तीन, मोहोळ तालुक्‍यात सात, पंढरपूर तालुक्‍यात 28, सांगोल्यात नऊ तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीणमधील रूग्णसंख्या आता 41 हजार 839 झाली असून मृत्यूची संख्या एक हजार 201 झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील 963 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. दुसरीकडे शहरातील रूग्णसंख्या आता 13 हजार 371 झाली असून त्यातील 677 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या शहरातील 725 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT