mahapalika solapur 
सोलापूर

ब्रेकिंग! महापालिका आयुक्तांच्या नोटीसीला केराची टोपली; आता होणार 'ही' कारवाई 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने घरोघरी सर्व्हे सुरू आहे. तर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेऊन त्यांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठविण्याच्या कामासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मात्र, तब्बल 257 कर्मचाऱ्यांनी आयुक्‍तांच्या आदेशानंतरही दांडी मारली आहे. आता या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी खुलासा दिलेला नाही. त्यामुळे आता त्यांची वेतनवाढ थांबविली जाणार आहे. 

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्‍त दीपक तावरे यांनी घरोघरी सर्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार त्यांनी शहरातील सर्वच कुटुंबांचा सर्व्हे झाल्याचा कागदोपत्री अहवाल सादर केला. मात्र, प्रत्यक्षात तेवढ्या कुटुंबांचा सर्व्हे प्रभावीपणे झालाच नाही. या पार्श्‍वभूमीवर शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला अन्‌ रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्याला जबाबदार धरत तावरे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील रुग्णांचा शोध घेणे, ज्येष्ठ नागरिक तथा गंभीर आजार असलेल्यांची ऍन्टीजेन टेस्ट करण्याच्या हेतूने पुन्हा एकदा घरोघरी सर्व्हे सुरू झाला आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्‍तीचा शोध घेण्यासाठी महापालिकेने अतिरिक्‍त कर्मचारी नियुक्‍त केले. तत्पूर्वी, आपत्तकालीन कायद्यानुसार नियुक्‍त कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला. तरीही अडीचशेहून अधिक कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कामावर आलेच नाहीत. 

'बायोमेट्रिक'च्या निर्णयात बदल नाहीच 
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सोलापूरसह राज्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, सुधारित आदेशात त्यासंबंधी काहीच स्पष्ट सूचना नसल्याने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली. तत्पूर्वी, सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हजर असल्याचा फोटो पाठविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काही कर्मचारी फोटो काढून पुन्हा घरी जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर आयुक्‍तांनी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेतला. या निर्णयाला बहुतांश कर्मचाऱ्यांनी विरोध केला, परंतु महापालिका प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. बायोमेट्रिक हजेरी न नोंदविणाऱ्यांना वेतन कपातीचा इशाराही आयुक्‍तांनी दिला आहे. 

राखी बांधून घ्या अन्‌ कामगारांचे प्रश्‍न सोडवा 
महापालिका कर्मचारी कोरोना महामारीच्या काळातही जीव धोक्‍यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांचे विविध प्रश्‍न असून महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून घ्यावी आणि कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत. बायोमेट्रिक हजेरी सर्वत्र बंद असतानाही आयुक्‍तांनी घेतलेला निर्णय रद्द करावा यासह दहा मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. आयुक्‍त स्वत: कार्यालयात उपस्थित नसल्यास त्यांच्या नामफलकास राखी बांधली जाईल, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली. 


खुलास न देणाऱ्या अन्‌ असमाधानकारक खुलासा देणाऱ्यांवर कारवाई 
कोरोनाला रोखण्याच्या कामासाठी महापालिकेने कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. मात्र, अडीचशेहून अधिक कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. आता असमाधानकारक खुलासा देणाऱ्या तथा खुलासा न देणाऱ्यांची वेतनवाढ थांबविण्यात येईल. दुसरीकडे बायोमेट्रिक हजेरीचा प्रशासकीय निर्णय असून तो कर्मचाऱ्यांना बंधनकारक असेल. 
- पंकज जावळे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT