corona 
सोलापूर

सोलापूर महापालिका हद्दीत, 541 अहवालामध्ये 52 कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 541 अहवालामध्ये 489 अहवाल निगेटिव्ह आले असून 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 106 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर महापालिका हद्दीत कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या पाच हजार 291 झाली आहे. कोरोना चाचणीचे 270 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत महापालिका हद्दीत नव्याने एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. बुधवारी रात्री बारापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात शिवाजी नगर बाळे, चातक सोसायटी मुरारजी पेठ, नडगिरी पेट्रोल पंपाजवळ विजापूर रोड, साठे पाटील वस्ती देगाव नाका, सिद्धेश्वर नगर मजरेवाडी, अनिता नगर एमआयडीसी रोड, न्यू पाच्छा पेठ, अरविंद धाम पोलीस वसाहत, मुरारजी पेठ, बसवेश्वर नगर, अवंती नगर, शेटे नगर, उत्कर्ष नगर विजापूर रोड, भारतरत्न इंदिरा नगर, उज्वल सोसायटी मुरारजी पेठ, विद्या नगर शेळगी, लोकमान्य नगर मजरेवाडी, बुधवार पेठ, शिवाजी नगर बाळे, रेसिडेन्स क्वॉर्टर सिव्हिल, कल्याण नगर जुळे सोलापूर, संतोष नगर बाळे, वैष्णवी हाइट्‌स बाळे, एसआरपी कॅंप सोरेगांव, यामिनी नगर विजापूर रोड, गंगाधर नगर, हत्तुरे वस्ती, अमृत नगर जवळ, बापुजी नगर या भागात 52 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT