Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांचे नववर्षातील धोरण

ना संकल्प, ना विकल्प ओन्ली प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : चांगल्या कार्याची सुरवात करण्यासाठी दिवस ठरवावा लागत नाही. त्यामुळे नवीन वर्षाचा कोणताही संकल्प अथवा विकल्प मी करणार नाही. परंतु चालू स्थितीतील प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण करून शहरवासीयांना अधिकाधिक सुविधा कशा पद्धतीने देता येईल, यावर माझा भर असेल, असे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.

महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये विकासात्मक कामातून जवळीकता निर्माण होण्याऐवजी असुविधांमुळे नेहमीच दुरावा राहिला आहे. राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या राजकारणात भरडला जाणारा विकास प्रशासकीय कारकिर्दीत उभारी घेईल, असा विश्वास शहरवासीयांना होता, तोदेखील विश्वास मागील वर्षभरात प्रशासनाला दाखविता आले नाही. स्मार्ट सिटीतून शहर गावठाण भाग विकसित झाला असला तरी शहर हद्दवाढ भागात अद्यापही मूलभूत सुविधाही पोचल्या नाहीत.(Solapur News)

प्रशासनासमोर पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज या आव्हानांसह शहराचे आरोग्यही चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील वर्षात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांचे कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढण्यात आले. या काढलेल्या टेंडरची कामे या नव्या वर्षात पूर्ण करून घेण्याची जबाबदारी नव्या आयुक्तांवर आली आहे. आयुक्तांच्या विरोधात कामगार, आयुक्त विरुध्द सीईओ, आयुक्त विरुध्द पदाधिकारी व लोकप्रतिनिधी असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. गतिमान प्रशासनासाठी केवळ आयुक्तांचा निर्णय महत्त्वाचा नसून अंमलबजावणी करणारे संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची गती महत्त्वाची आहे.

मागील वर्षात सोलापूरकरांनी प्रशासकीय कारभाराचा आणि निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या सदस्यांचा विकास सोलापूरकरांनी पाहिला. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली आव्हाने ही यंदाच्या वर्षीही कायम असणार आहेत. नूतन आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासमोर असलेल्या नवीन आव्हानांबाबत नव्या वर्षातील नव्या संकल्पना बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, नवे संकल्प किंवा नवे विकल्प यावर माझा विश्वास नाही. शहरातील विकास कामे ठरवून करता येणार नाही. सध्या अर्धवट, चालू स्थितीतील कामे पूर्ण प्रकल्प प्राधान्याने मुदतीत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यावर भर असेल.

सरत्या वर्षातील सार

वॉटर ऑडिट, मिळकतींच्या सर्व्हेतून अपडेट डाटा संकलन

ड्रोनद्वारे प्रथमच शहराचा डिजिटल विकास आराखडा

ई-ऑफिसमुळे कामकाजात आणला पारदर्शीपणा

समांतर जलवाहिनी अडकली निविदेत

निवडणुकीच्या प्रतीक्षेत सरले वर्ष

नवीन वर्षातील आव्हाने

शहर पाणीपुरवठा सुरळीत करणे

समांतर जलवाहिनीचा मार्गी लावणे

महसूल उत्पन्न वाढवून शहराचा विकास साधणे

अमृत दोन व उड्डाणपुलासाठी निधी मिळविणे

विकासाचा तीनतेरा अन्‌ महापालिका निवडणुकीची धामधूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT