file Photo sakal
सोलापूर

सोलापूर : कोरोनाचे ४० नवे रुग्ण; ५१ जण कोरोनामुक्त

कोरोना मुक्त झालेल्या ५१ जणांमध्ये १७ जण महापालिका हद्दीतील आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज (गुरुवारी) कोरोनाचे नवे ४० रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी ५१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज सोलापूर महापालिका हद्दीत १२ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोना मुक्त झालेल्या ५१ जणांमध्ये १७ जण महापालिका हद्दीतील आहेत. ३४ जण हे ग्रामीण भागातील आहेत. सध्या कोरोनाचे २९६ ॲक्‍टिव पेशंट आहेत. त्यामध्ये २३१ जण ग्रामीण भागातील तर ६५ जण हे महापालिका हद्दीतील आहेत. आज आढळलेल्या २८ रुग्णांमध्ये करमाळा, माढा व पंढरपूर या तालुक्‍यातील प्रत्येकी पाच, माळशिरस व बार्शी तालुक्‍यातील प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश आहे.

उत्तर सोलापूर व सांगोला तालुक्‍यामध्ये प्रत्येकी दोन व मोहोळ तालुक्‍यात एक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात ॲक्‍टिव असलेल्या २३१ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९ रुग्ण हे पंढरपूर तालुक्‍यातील आहेत. ४३ रुग्ण माढा तालुक्‍यात, २९ रुग्ण करमाळा तालुक्‍यातील आहेत. सांगोला, मंगळवेढा व बार्शी या तालुक्‍यात प्रत्येकी १३, उत्तर सोलापूर तालुक्‍यात १२, अक्कलकोटमध्ये सहा व दक्षिण सोलापूरमध्ये तीन ॲक्‍टिव कोरोना बाधित रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT