सोलापूर

.... अन्यथा शोले स्टाईल आंदोलन 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर :  शहरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत टॉवरच्या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तातडीने फौजदारी करा, अन्यथा मोबाईल टॉवरवर बसून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी देण्यात आला. याचवेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना टॉवरची प्रतिकृती भेट देण्यात आली. 

शहरवासीयांचा जीव धोक्‍यात
शहरात उभारण्यात आलेल्या टॉवरमुळे शहरवासीयांचा जीव धोक्‍यात आल्यासंदर्भातील वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय शहराच्या विविध भागात मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. हे टॉवर उभारताना निकषानुसार उभारले की नाही, याचीही खात्री महापालिकेने केली नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. अतिशय वर्दळीच्या भागातही असे टॉवर असल्याने निष्पाप नागरिकांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. तब्बल 178 अनधिकृत मोबाईल टॉवर नियमित करून घेण्यासाठी नोटीस दिल्यावरही संबंधित कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

एकाही कंपनीने घेतले नाहीत परवाने 
एकेका टॉवरच्या माध्यमातून जनतेकडून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कंपन्या मिळवतात. या टॉवरला मोठमोठे जनरेटर, उच्च विद्युतदाबाचा वीजपुरवठा केला जातो. त्यादृष्टीने अग्निसुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक आहे. त्यामुळे टॉवरची उभारणी करताना अन्य दाखल्यांबरोबरच अग्निसुरक्षा निधी भरून अग्निशमन विभागाचाही परवाना घेणे बंधनकारक आहे. 2006 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार दाखल्यांचे नूतनीकरण करून सुरक्षेची पूर्तता करणेही नियमाधिन आहे. परंतु दुर्दैवाने आजअखेर कोणत्याही टॉवरनी असे परवाने घेतले नाहीत असे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर युवक कॉंग्रेसने आंदोलन करीत अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल टॉवरची प्रतिकृती भेट दिली. या वेळी प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, शहराध्यक्ष बाबा करगुळे, सुमीत भोसले, ओंकार गायकवाड, योगेश मार्गम, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सैफन शेख, राजासाब शेख उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

Credit Card : या सोप्या सवयी लक्षात ठेवल्या, तर क्रेडिट कार्ड देईल तुम्हाला मोठा फायदा! फायदा हवा? हे एकदा नक्की पाहा!

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

SCROLL FOR NEXT