Solapur Municipal Corporation sakal
सोलापूर

Solapur : महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर

महापालिकेचे महसुली उत्पन्न आणि होणारा खर्च आदींचा ताळेबंद हा वास्तववादी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. गतवर्षीच्या अंदाजपत्रकातील भांडवली निधीतून करण्यात आलेल्या २५ कोटींच्या १७ रस्त्यांमुळे सोलापूकरांना दिलासा मिळाला. नूतन आयुक्त शीतल तेली उगले यांचे वास्तववादी बजेटकडे सोलापूकरांचे लक्ष आहे.

महापालिकेचे महसुली उत्पन्न आणि होणारा खर्च आदींचा ताळेबंद हा वास्तववादी असायला पाहिजे, यावर प्रशासनाचा भर आहे. गतवर्षी मंजूर अंदाजपत्रकाचा कारभार हा प्रशासकाच्या हाती आला.

तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी नगरसेवकांची भांडवली निधीचा योग्य विनियोग करीत शहरातील मुख्य रस्ते दुरुस्ती हाती घेतले. ज्या रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे, अशा १७ रस्त्यांची दुरुस्ती करून शहरातील रिंगरुट रस्ते सुस्थितीत केले. त्यामुळे सोलापूकरांना दिलासा मिळाला. या वर्षीही शासनाचे मोठे प्रकल्प आहेत,

ते पूर्णत्वास नेऊन विशिष्ट असा परिसर नव्हे तर संपूर्ण शहराचा समतोल विकास साधेल यावर आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील कोणकोणते प्रकल्प मार्गी लागणार,

त्यातून शहराचा समतोल विकास कसा साधणार? नागरिकांच्या समस्यांवर कशा पध्दतीने तोडगा काढणार? नव्याने कोणते महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेणार? शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी धोरणात्मक निर्णय काय असणार? याकडे सोलापूकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT