सोलापूर

आरोग्यमंत्र्याचा आदेश `या` स्मार्ट सिटीतील डस्टबीनमध्ये

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्यावर थुंकणाऱ्यास एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा आदेश दिला. त्यानुसार महापालिकेने प्रसिद्धीकरणही दिले. मात्र गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेच्या पथकाला एवढ्या मोठ्या शहरात एकही रस्त्यावर थुंकणारा सापडला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदेशाची कडक अंमलबजावणी झाली नाही हेच दिसून आले आहे. 

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकणे किंवा सिगारेटचा झुरका घेणे स्मार्ट सोलापूरकरांना भलतेच महाग पडणार आहे. थुंकणे आणि झुरका घेण्याचा गुन्हा तीन वेळेला करणाऱ्या व्यक्तींना तब्बल पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे.


मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि धुम्रपान करणे यास बंदी आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुगंधित सुपारी, तंबाखूंची साठवण व विक्रीलाही बंदी घालण्यात आली आहे. सध्या कोविड महामारीचा संसर्ग हा थुंकीतून होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि धुम्रपान करणाऱ्यांना आता जबर दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई महापालिकेच्या आठ विभागीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षकांमार्फत केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर थुंकताना कुणी आढळल्यास त्याला जागेवर दंड भरावा लागणार आहे. 


थुंकणे आणि धुम्रपान करताना पहिल्यांदा सापडल्यास मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार एक हजार रुपये दंड व एक दिवस समाजसेवा, दुसऱ्यांदा गुन्हा करताना सापडल्यास तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस समाजसेवा आणि तिसऱ्यांदा सापडल्यास पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस समाजसेवा अशी शिक्षा केली जाणार आहे. या शिवाय, या तीन्ही वेळेस भारतीय दंड अधिनियमातील तरतुदीनुसार सहा महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. सिगारेट किंवा तंबाखूजन्य उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर पहिल्या गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड आणि दोन वर्षे शिक्षा, तर विक्रेत्यांना पहिल्या गुन्ह्यात एक हजार रुपये दंड व एक हजार रुपये शिक्षा ठोठावली जाणार आहे. 


आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका आपली कारवाई करणार आहे. त्यासाठीचे नियोजन लवकरच करण्यात येईल.
- विजयकुमार कांबळे, जनसंपर्क अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT