सोलापूर

`या` महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळतील प्रत्येकी 10 लाख

विजयकुमार सोनवणे

सोलापूर :  मॅनव्होल किंवा ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून 1993 पासून आतापर्यंत सुमारे 25 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या वारसाचा शोध होत आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे वारस पात्र ठरतील त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत महापालिकेकडून मिळणार आहे. 

1993 पासूनच्या दुर्घटनेतील कामगारांचे वारस लाभार्थी 
"राज्यातील सफाई कामगारांना विम्याचे कवच' ही बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने विम्यासंदर्भात आदेश काढला आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 1993 पासून अशा घटनांत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शोधून त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्यावी लागणार आहे. 

सफाई कर्मचारीच समस्याग्रस्त
सोलापूर शहरात स्वच्छतेचे काम करणारे महापालिकेतील कर्मचारीच समस्याग्रस्त असल्याने शहरातील कचऱ्याची समस्या आणखी बिकट होत आहे. त्याकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहात नसल्याचेच चित्र आहे. सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा व क्षेत्रफळाचा व्यास वरचेवर वाढत आहे. परंतु, त्यामानाने शहर स्वच्छतेचा व सोयीसुविधांचा प्रकर्षाने अभावच आहे. सुमारे 12 लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ दोन हजार स्वच्छता कर्मचारी आहेत. यापैकी 25 टक्के कर्मचारी दक्षतेसाठीच्या सुविधांअभावी महिनाभरातून अदलीबदलीने आजारीच असतात. 

साधनांचा अभाव 
शहरात झाडलोट करणाऱ्यांना कचरा उचलण्यासाठी लोखंडी पाट्या नाहीत. संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून हातमोजे द्यावेत, कचरा वाहून कोंडाळ्यापर्यंत नेण्यासाठी हातगाडी द्यावी. या गोष्टींचा अभाव आहे. त्यांना 35 ते 40 हजार चौरस फूट इतक्‍या क्षेत्रफळाचे काम द्यावे. पण प्रत्यक्षात याच्या दुप्पट भार सोसावा लागतो. शहरात कचराकोंडाळ्यांची कमतरता आहे. याशिवाय कचरा व गटार बिगाऱ्यांना गटार स्वच्छता करताना गमबूट द्यावेत. दिवसाला दोन हजार रनिंग फूट गटार सफाई कामाची तरतूद असताना कर्मचाऱ्यांअभावी संपूर्ण वस्तीचे काम करावे लागते. प्रत्यक्ष मैलाच्या चेंबरमध्ये उतरून चोकअप काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी चेहऱ्यावर लावण्यास गॅसमास्कची आवश्‍यकता असूनही पालिकेकडून मिळत नाही. महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT