Solapur sakal
सोलापूर

Solapur : वाह रे वा ! सोलापूर महापालिकेचा कारभार; चक्क पावसाळ्यात म्हणे बुजविणार खड्डे, १० कोटी घालविणार पाण्यात

दरम्यान, शहर आणि हद्दवाढ भागातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Solapur - महापालिकेने सोलापूर शहरातील ३४० कि.मी. रस्ते खोदाई करण्यास परवानगी दिली. मात्र, खोदकाम झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी एप्रिल महिन्यात दहा कोटींची निविदा काढली. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, जुलै महिन्यात कार्यादेश प्राप्त झाल्याने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम महापालिका हाती घेत आहे

पावसाने खड्डे उखडून निघणार आणि दहा कोटी पाण्यात जाणार, अशीच परिस्थिती महापालिकेच्या खड्डे मुक्त शहर अभियानाची आहे. यातून या अभियानाची वाट लागणार आहे. शहरातील नागरिकांच्या खिशामधील तब्बल १० कोटी वायपट जाणार आहेत.

दरम्यान, शहर आणि हद्दवाढ भागातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांबरोबरच नागरिकांचे शरीर खिळखिळे होत असल्याचे वास्तव आहे. असे असतानाच पावसाळ्यात भरून घेतलेले खड्डे पुन्हा पडणार आहेत.

खड्ड्यांमुळे वाहनांची आणि शहरातील नागरिकांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ अशीच राहणार आहे. खड्डे भरण्यावरचा दहा कोटींचा खर्च वाया जाणार आहे.

यामध्ये नागरिकांची गैरसोय कायमच राहणार आहे. कर रूपाने महापालिकेच्या तिजोरीत आलेले नागरिकांच्या खिशामधील पैशांवर ठेकेदार, टक्केवारीचे लाभधारक महापालिकेचे अधिकारी यांचे मात्र भले होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील चांगले, मातीचे, खडकाचे सर्व प्रकारचे रस्ते गॅसलाईन, रिलायन्स केबल, वोडाफोन, आयडिया आणि स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे अशा विविध कामांसाठी रस्ते खोदाईचे काम सुरू आहे. याबदल्यात महापालिकेने संबंधित कंपनीकडून रस्ते खोदाईचे पैसे भरून घेतले.

मात्र, रस्ते पूर्ववत केले नाहीत. या खोदकामाप्रसंगी शहरातील अनेक ठिकाणचे ड्रेनेजलाइन फुटले, नळजोड तुटले गेले. झालेल्या तोडफोडीच्या दुरुस्तीवरून संबंधित कंपनी व महापालिका अधिकारी यांच्यामध्ये ‘तू-तू, मैं-मैं’ असा प्रकार सुरू आहे.

कंपनी म्हणते प्रशासनाकडे आम्ही नुकसानीपोटी रक्कम भरूनच परवानगी घेतली आहे. तर महापालिका अधिकारी म्हणतात, केवळ रस्ता दुरुस्तीपोटीची रक्कम भरून घेण्यात आली. या प्रकारात मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पहिल्या टप्प्यात जुळे सोलापूर भागात गॅसलाईनसाठी १६४ कि.मी रस्ते खोदण्यात आले. तर जिओ केबलसाठी १५ कि.मी. अंतरावरील रस्त्यांची खोदाई झाली. तथापि, या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. मागील पावसाळ्यात व रात्रीच्यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

यंदाही पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले नसल्याने तीच परिस्थिती उद्‌भवली आहे. आयुक्तांनी खोदाईनंतर त्वरित रस्ता पूर्ववत करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात रस्ता खोदाई परवानगी देताना नुकसानीपोटी भरून घेतलेल्या रक्कमेची निविदा प्रक्रिया राबविली आहे.

‘एसएमसी’चा कारभार म्हणजे बैल गेला अन्‌....

११६ कि.मी. रस्ते पूर्ववत करण्यासाठी झोननिहाय १४ ठिकाणांसाठी दहा कोटींची निविदा प्रक्रिया राबविली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुली करण्यात आली. एप्रिल अखेर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात होणार होती.

पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यात येणार होते. परंतु, महापालिकेने या कामांत तीन महिने दिरंगाई केली. पावसाळ्यापूर्वी खड्डे न बुजविता पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचा कारभार म्हणजे ‘बैल गेला अन्‌ झोपा केला’ केला यापेक्षा वेगळा नही.

या कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागातील रस्त्यांची वाट लागली. गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने नागरिकांच्या वाहनांची आणि आरोग्याची वाट लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT